Brendon McCullum : न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रेंडन मॅक्युलम आयपीएल 2022 नंतर कोलकाता नाइट रायडर्सचं प्रशिक्षक पद सोडण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघाने ब्रेंडन मॅक्युलमला कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत ब्रेंडन मॅक्युलमला कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले.
मागील काही दिवसांपासून इंग्लंडच्या कसोटी संघाची कामगिरी खालावली होती. ऑस्ट्रेलियाविरोधात दारुण पराभव मिळाला होता. वेस्ट इंडिजमध्येही खराब कामगिरी झाली होती. सततच्या पराभवानंतर जो रुटने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कसोटी संघात मोठे बदल करण्यात आले. अष्टपैलू बेन स्टोक्सकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर ब्रेंडन मॅक्युलमला प्रशिक्षकपादाची धुरा दिली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन, इंग्लंड पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक मो बाबाटच्या निवड समितीला ब्रेंड मॅक्युलमने प्रभावित केले. त्यामुळेच इतर उमेदवारांपेक्षा ब्रेंडन मॅक्युलमचं वजन जास्त होते. आता इंग्लंड संघाचं कर्णधारपद सांभाळण्यापूर्वी मॅक्युलम आयपीएलमधील केकेआर संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.
ब्रेंडन मॅक्युलमकडे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद आहे. तसेच कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनबागो नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकपदीही तोच आहे. पण इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याआधी तो या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकपादाचा राजीनामा देईल. 2021-2022 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी सुधारण्याचं प्रमुख लक्ष मॅक्युलमकडे असेल. इंग्लंडचा संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. 'इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाल्याने आनंदी आहे. संघाला यशस्वी करणे हेच माझे लक्ष्य असेल, असे मॅक्युलम म्हणाला.'
हे देखील वाचा-
- CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...
- Jadeja Ruled Out : अडचणीत असणाऱ्या चेन्नईला आणखी एक झटका, रवींद्र जाडेजा उर्वरीत आयपीएलला मुकणार
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?