Rohit Sharma Chennai Super Kings vs Mumbai Indians IPL 2022 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ठरलेली मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ आज आमनेसामने आहेत. वानखेडे स्टेडिअमवर दोन्ही संघाची लढत होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात दोन्ही संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे तर चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. यंदा रोहितवर फॉर्म रुसल्याचे दिसतेय. स्विंगविरोधात रोहितची बॅट शांत असल्याचे आतापर्यंतच्या आकेडेवारीवरुन दिसतेय. चेन्नईविरोधात होणाऱ्या सामन्यात रोहित शर्माला सावध फलंदाजी करावी लागणार आहे. 


 यंदाच्या हंगामात रोहित शर्माने 11 सामन्यात फलंदाजी केली आहे. या 11 सामन्यात रोहित शर्माने 200 धावा केल्या आहेत. आश्चर्य म्हणजे, रोहितला यंदा एकही शतक झळकावता आलेले नाही. यंदा रोहितची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 43 इतकी आहे. रोहित शर्मा आयपीएलमधील स्विंग गोलंदाजाविरोधात अपयशी ठरत असल्याचे दिसतेय. अतापर्यंत रोहित शर्माने 32 स्विंग चेंडूचा सामना केलाय. यावर रोहित शर्माला फक्त 33 धावा काढता आल्यात. यावेळी रोहित शर्मा चार वेळा बाद झालाय.  


यंदाच्या हंगामात 21 एप्रिल रोजी चेन्नई आणि मुंबई यांच्यात पहिला सामना पार पडला होता. हा सामना चेन्नईने तीन विकेटने जिंकला होता. या सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. मुकेश चौधरीने रोहित शर्माला शून्यावर तंबूत धाडले होते. सलामीला आलेल्या रोहित शर्मा दोन चेंडू काढून माघारी परतला. मुंबईने या सामन्यात 155 धावा केल्या होत्या. हा सामना चेन्नईने तीन विकेट राखून जिंकला होता. दरम्यान, आज होणाऱ्या सामन्यातही रोहित शर्माला सावध फलंदाजी करावी लागणार आहे. राहुल चाहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरी चेन्नईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे. 


हे देखील वाचा-