BCCI takes action Munaf Patel : दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने राजस्थानचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 188 धावा केल्या. यानंतर, राजस्थाननेही निर्धारित 20 षटकांत 188 धावा केल्या. यानंतर दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. आता विजयानंतरही बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. 


मुनाफ पटेलवर का झाली कारवाई? 


आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल (Munaf Patel) यांना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि बुधवारी अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या त्यांच्या संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना एक डिमेरिट पॉइंट देखील मिळाला आहे. मुनाफ पटेल यानी कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा मान्य केला, जो खेळाच्या भावनेविरुद्ध वर्तनाशी संबंधित आहे. लेव्हल 1 च्या आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. 






भारतासाठी 2011 चा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला.... 


मुनाफ पटेल हा 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि एकूण 11 विकेट्स घेतल्या. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 35, एकदिवसीय सामन्यात 86 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार विकेट्स आहेत. त्याने 2018 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 


दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर   


अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ सध्याच्या आयपीएल हंगामात खूप चांगली कामगिरी करत आहे. या संघाने चालू हंगामात एकूण 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. त्याचा 10 गुणांसह नेट रन रेट अधिक 0.744 आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची पूर्ण शक्यता आहे.


हे ही वाचा - 


IPL दरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई! कोचसह 3 जणांची हकालपट्टी, टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय?