IPL 2025, DC vs RR: काल झालेल्या दिल्ली विरुद्ध राजस्थान (Rajasthan Royals) या सामन्यात दिल्लीने (Delhi Capitals) सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून स्पर्धेत आपणच सुपर आहोत हे सिद्ध केले.. नाणेफेक जिंकून राजस्थान संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून दिल्ली संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले.. 15 चेडूत्व 34 धावांची सलामी देऊन फ्रेसर बाद झाला... करुण दुर्दैवाने धावचीत झाला. नंतर आलेल्या राहुल याने पोरेल सोबत भागीदारी केली पण 63 धावांसाठी त्यांनी तब्बल 57 चेंडू घेतले....या वेळी त्याची धावगती मंदावली ...पण जेव्हा अक्षर पटेल हा मैदानात येतो ते तेव्हा तो किती सहज खेळतो.. कालसुद्धा तो सहज खेळला..त्याचे फलंदाजी मधील सातत्य कौतक्सापद आहे... त्याने भारताकडून 20/20 विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफी या दोन्ही स्पर्धेत खेळत असताना क्रमांक 4 आणि 5 वर येऊन कितीतरी वेळा उपयुक्त खेळ्या खेळल्या आहेत.. आज सुद्धा त्याने 14 चेंडूत 34 धावा केल्या आणि स्टब सोबत 19 चेंडूल 41 धावांची भागीदारी केली..त्यात स्टबने 18 चेंडूत 34 धावा केल्या... अक्षर आणि स्टब या दोघांकडे षटकार मारण्याची क्षमता मोठी आहे.. स्टबने 19 चेंडूत... 42 धावांची भागीदारी आशुतोष सोबत करून दिल्ली संघाची धावसंख्या 188 पर्यंत नेली...
188 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात आज छानच झाली 34 चेंडूत 61 धावांची सलामी दिल्यावर राजस्थान संघाचे दुर्दैव आडवे आले...कर्णधार संजू जखमी होऊन मैदानातून बाहेर गेला...नंतर आलेल्या पराग अक्षराच्या एका उत्तम चेंडूवर त्रिफळाचित झाला...या आधी स्पर्धेत पॉवर प्ले मध्ये राजस्थान संघाचा स्ट्राईक रेट 162 इतका होता..आणि मधल्या षटकात 132 इतका होता..पण काल त्यांनी ती कमतरता भरून काढली.... 4 त्या क्रमांकावर आलेल्या नितीश आणि यशस्वी यांनी 36 धावांची भागीदारी केली..आज सुद्धा यशस्वी याने एक अर्धशतक झळकविले...आणि त्याने 4 षटकार मारले..
पण काल वादळी खेळी खेळून गेला तो नितीश राणा...त्याने 28 चेंडूत 51 धावांची खेळी केली..अक्षर च्या गोलंदाजीवर तो बाद होता होता वाचला पण 18 या षटकात स्टार्क च्या एका अप्रतिम यॉर्कर वर पायचीत सापडला...आणि तिथूनच राजस्थान संघ बॅक फुटवर गेला...आणि राजस्थानच्या पराभवाची कहाणी स्टार्क ने लिहिली.. 18 व्या षटकात त्यांनी 8 धावा देऊन एक बळी मिळविला...त्यानंतर शेवटच्या षटकात 9 धावांचा बचाव केला... डेथ मध्ये गोलंदाजी करीत असताना उजव्या फलंदाजसाठी तो राऊंड दि विकेट आणि डावखुऱ्या फलंदाज साठी तो ओव्हर दि विकेट येऊन तिखट यॉर्कर टाकून गेला..आणि सामना सुपर ओव्हर मध्ये नेला...जेव्हा सामना सुपर ओवर मध्ये गेला तिथेच दिल्ली जड जाणार हे उघड होते..राजस्थान संघाने 11 षटकार मारले तर दिल्ली संघाने 7 ...तरी सुद्धा पराभव राजस्थान संघाच्या वाट्याला आला...असे क्वचित घडते..याला कारण होते स्टार्क ची अचूक आणि भेदक गोलंदाजी. यशस्वी ऑस्ट्रेलियामध्ये त्याला म्हणाला होता की तुझे चेंडू खूप हळू येतात... आज त्याचे चेंडू त्याच्या संघाविरोधात किती वेगवान असतात हे त्यांनी ध्रुव जुरेल आणि हेटमयार ला विचारायला हवे
सुपर ओवर मध्ये पुन्हा एकदा स्टार्क ने केवळ 12 धावा दिल्या...याला कारण होते पराग आणि यशस्वी चे धावचीत होणे.. 12 धावांचे आव्हान संदीप च्या षटकात 4 चेंडूत पूर्ण करून 10 गुणांसहीत गुणतालिकेत आघाडी घेतली..
काल स्टार्कच्या मदतीने विजयाची 3 अक्षर दिल्ली संघानी लिहिली.. राहुल मुळे त्यांची मधली फळी भक्कम वाटते...आशुतोष आणि स्टब मुळे ती धोकादायक ... आणि अक्षर मुळे ती संतुलितु वाटते... सगळ्याच संघांच्या बाबतीत असे म्हणता येत नाही म्हणून दिल्ली संघ वेगळा आहे आणि आयपीएल मध्ये सध्या या राजधानीचे राज्य आहे..