कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा रद्द होणार IPL 2020? बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले...

एबीपी माझा वेब टीम Updated at: 31 Aug 2020 10:38 AM (IST)

गेल्या शुक्रवारी एका खेळाडूसह सीएसकेच्या संघातील 12 क्रू मेंबर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलवर अनिश्चिततेचं सावटं दिसत आहे.

NEXT PREV

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनवर पुन्हा एकदा संकटाचं सावट दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा 13वा सीझन ठरलेल्या वेळी पार पडू शकला नाही. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता बीसीसीआयने यूएईमध्ये 13व्या सीझनच्या आयोजनाचा निर्णय घेतला. परंतु, टुर्नामेंटला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या 12 जणांना कोरोनाची लागण झाली.


सीएसकेचा संघ एक आठवडाआधी दुबईत दाखल झाला आहे. त्यादरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत चेन्नई सुपर किंग्सचे 12 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोनामुळे आयपीएल रद्द करण्यात येणार का? असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. अशातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर आपलं मौन
सोडलं आहे.


सौरव गांगुली यांच्या वक्तव्यातून असं दिसून येत आहे की, अद्याप आयपीएल रद्द होणार की, नाही? याबाबत स्थिती फारशी स्पष्ट झालेली नाही. सौरव गांगुली म्हणाले की,



चेन्नई सुपर किंग्समधील खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याप्रकरणी मी काहीच करू शकत नाही. आता आम्ही आयपीएलचं 13वं सीझन 19 सप्टेंबरपासून सुरु होणार की नाही? याबाबत काहीच सांगू शकत नाही.-


सौरव गांगुली यांनी सर्व काही ठिक होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,



आम्ही अशी अपेक्षा करत आहोत की, इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन व्यवस्थित पार पडेल. आयपीएलचा संपूर्ण कार्यक्रम बराच वेळ सुरु राहणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व काही सुरळीत पार पडेल अशी आशा करू शकतो.-


आतापर्यंत जारी झालं नाही शेड्यूल


गेल्या शुक्रवारी एका खेळाडूसह सीएसकेच्या संघातील 12 क्रू मेंबर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच गेल्या काही दिवसांपासून दुबईतही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याव्यतिरिक्त सुरेश रैना कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेचा हवाला देत भारत परतला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या संघाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सुरेश रैना म्हणाला की, तो आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


एवढचं नाहीतर इंडियन प्रीमियर लीगचं 13वं सीझन सुरु होण्यास आता केवळ 20 दिवसांचा कालावधी उरला आहे. परंतु, बीसीसीआयच्या वतीने अद्याप सामन्यांचं शेड्यूल जारी करण्यात आलेलं नाही. बीसीसीआयने एक महिन्याआधी घोषणा केली होती की, आयपीएलचं आयोजन 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरमध्ये करण्यात येईल.


महत्त्वाच्या बातम्या : 


IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह


IPL 2020 | सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला!

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.