IPL Title Sponsor: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणजेच, इंडियन प्रीमीयर लीग (Indian Premier League). यंदा आयपीएलमध्ये (IPL) मोठा बदल होऊ शकतो. हा बदल कोणत्याही खेळाडूबाबत किंवा संघाबाबत नसून टायटल स्पॉन्सरबाबत (Title Sponsor). भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (Board of Control for Cricket in India)नं आयपीएलच्या 2024-2028 सीझनसाठी टायटल स्पॉन्सरबाबत टेंडर (निविदा) मंगळवारी काढण्यात आलं आहे. आता आगामी सीझनपासून इंडियन प्रीमियर लीगला (IPL) 'टाटा आयपीएल' (TATA IPL) असं संबोधलं जाणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.     

  


बीसीसीआयकडून टेंडर जारी                           


प्रतिष्ठित T20 लीग आयपीएलला पुढील सीझनसाठी नवीन टायटल स्पॉन्सर मिळण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयपीएलच्या 2024-2028 सीझनच्या टायटल स्पॉन्सर अधिकारांसाठी निविदा जारी करण्याबाबत माहिती दिली. BCCI नं एका निवेदनात म्हटलं आहे की, "इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची गव्हर्निंग कौन्सिल 2024-2028 या सीझनसाठी लीगचे टायटल स्पॉन्सर अधिकार प्राप्त करण्यासाठी नामांकित संस्थांकडून बोली मागवते."


टाटांचं टेंडर 2024 पर्यंतच 


आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरसाठी टाटा ग्रुपसोबतचा करार 2024 सीझनच्या शेवटपर्यंत वैध होता आणि बीसीसीआयनं आता त्यासाठी नवी निविदा काढल्या आहेत. दरम्यान, टाटा पुन्हा टेंडर भरू शकतात आणि पुन्हा आपलं नाव आयपीएलचं टायटल स्पॉन्सर म्हणून निश्चित करू शकतात. जर असं झालं तर पुन्हा पुढच्या चार वर्षांच्या कालावधीसाठी IPL 'टाटा आयपीएल' म्हणून संबोधलं जाईल.  


8 जानेवारीची शेवटची तारीख 


भारत आणि शेजारील देश चीन यांच्यातील राजकीय तणावामुळे 'व्हिवो' (VIVO) कंपनीनं माघार घेतली, आणि त्यानंतर टाटा समुहानं ड्रीम-11 कडून टायटल स्पॉन्सरशिप घेतली होती. 2021 मध्ये टाटांनी चिनी स्मार्टफोन निर्माता VIVO ची जागा घेतली. आता बीसीसीआयनं टेंडर जारी केल्यापासून इतर कंपन्याही आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर भरू शकतात. 8 जानेवारी 2024 पर्यंत टेंडर भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ITT मध्ये टेंडर भरण्यासाठी पात्रता, बोली लावण्याची प्रक्रिया, अधिकार आणि अटी-शर्थींचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया टायटल सॉन्सर म्हणून असलेलं शुल्क प्राप्त झाल्यानंतर प्रदान केलं जाणार आहे. 5 लाख रुपये+जीएसटी (नॉन रिफंडेबल) एवढं शुल्क आकारलं जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


रतन टाटांची 'ही' कंपनी गाशा गुंडाळणार! NCLT कडून विलीनीकरणास मान्यता