IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे, जो या वर्षाच्या अखेरीस आयोजित केला जाऊ शकतो. बीसीसीआयकडून कायम ठेवण्याचे धोरण लवकरच जाहीर केले जाऊ शकते. दरम्यान, बीसीसीआय आयपीएल फ्रँचायझीला 5 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. गेल्या वेळी सर्व संघांनी प्रत्येकी केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवले होते. यावेळी राईट टू मॅच नियम काढून टाकला जाऊ शकतो.
बीसीसीआयने हा रिटेन्शन नियम मंजूर केल्यास मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढू शकतात. अहवालात असा दावा केला जात आहे की, बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझीला 5-5 खेळाडू ठेवण्याची परवानगी देऊ शकते. ज्यामध्ये 3 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सला त्यांच्या संघातून मोठे नाव सोडण्यास भाग पाडले जाऊ शकते.
'हा' नियम अंबानीसाठी ठरणार अडचण
जर आयपीएल 2025 साठी फक्त तीन भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम निश्चित झाला. तर मुंबई इंडियन्ससाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मुंबईकडे अनेक स्टार भारतीय खेळाडू आहेत. पण संघ त्यांच्यापैकी फक्त तीनच खेळाडूंना कायम ठेवू शकेल. मुंबई फ्रँचायझीकडे कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्या रूपात चार दिग्गज खेळाडू आहेत, जे स्वतः मॅच विनर आहेत. मात्र, तीन भारतीय खेळाडूंच्या नियमामुळे त्यापैकी एकाला मुंबई इंडियन्सला सोडावे लागू शकते.
रोहित शर्मा की हार्दिक पांड्या, मुंबई कोणाला करणार रिलीज?
अशा स्थितीत मुंबई इंडियन्ससमोर चार बड्या खेळाडूंपैकी कोणतेही तीन खेळाडू निवडण्याचे आव्हान असेल. मुंबई भारतीय संघाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना सोडण्याची चूक करणार नाही, कारण या दोन्ही खेळाडूंसाठी बदली शोधणे कठीण आहे, मेगा लिलावात त्यांना परत खरेदी करण्याची शक्यता कमी आहे. या कारणास्तव मुंबई इंडियन्स या दोघांना कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यापैकी एकाला कायम ठेवता येईल.
गेल्या हंगामाच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते आणि तो एमआय व्यवस्थापनावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत रोहित स्वतः संघ सोडण्याची शक्यता आहे. तथापि, काहीही सांगणे खूप घाईचे आहे आणि आम्ही फ्रेंचायझीकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा केली पाहिजे.
हे ही वाचा -