चेन्नई :आयपीएलमधील (IPL 2024) 46 वी मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात पार पडली. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी धोनी तिच्या मैत्रिणींसह मॅच पाहण्यासाठी पोहोचली होती. साक्षी धोनीनं या मॅचमध्ये तिच्या इन्स्टाग्राम (Sakshi Dhoni Instagram Story) अकाऊंटवर ठेवलेली स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. साक्षी धोनीनं चेन्नई सुपर किंग्जच्या टीमला एक विनंती केली आणि चेन्नईच्या शिलेदारांनी पूर्ण देखील केली. साक्षीच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा होत आहे.


साक्षी धोनीनं इन्स्टाग्राम स्टोरीत काय म्हटलं?


महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी हिनं चेन्नईच्या टीमला मॅच लवकर संपवण्याची विनंती केली. चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर ती मॅच पाहण्यासाठी आली होती. तिनं चेन्नईच्या टीमला टॅग करुन मॅच लवकर संपवण्याची विनंती केली, ती चेन्नईनं 19 व्या ओव्हरमध्येच हैदराबादला ऑलआऊट करुन पूर्ण केली. 



साक्षी धोनीनं मॅचचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यासोबत तिनं म्हटलं की, चेन्नई सुपर किंग्ज कृपया आज मॅच लवकर संपवा, बेबी आने वाला है, कॉन्ट्रॅक्शन सुरु झालंय, तुम्हाला आत्याकडून विनंती, असं साक्षी धोनीनं इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं होतं. चेन्नईनं देखील यानंतर 19 व्या ओव्हरमध्येच मॅच जिंकली. 


चेन्नईचा सनरायजर्स हैदराबादवर 78 धावांनी विजय 


चेन्नई सुपर किंग्जनं होमग्राऊंडवर पुन्हा एकदा सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं. चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 विकेटवर 212 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सन रायजर्स हैदराबाद 134 धावांवर बाद झाला. चेन्नईनं 78 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा गुणतालिकेत हैदराबादला मागं टाकलं. 


धोनीचा अनोखा विक्रम 


महेंद्रसिंह धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्त्व करत नाही. धोनीच्या ऐवजी ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्त्वाची संधी देण्यात आली आहे. चेन्नईनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 150 मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या 150 मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या संघात होता. 150 मॅच जिंकणारा आयपीएलमधील एकमेव खेळाडू असा देखील विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. 


चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमधील पाचवा विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्जनं हैदराबादला मागं टाकून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. 


संबंधित बातम्या


CSK vs SRH : चेन्नई एक्स्प्रेस विजयाच्या ट्रॅकवर परतली, ऋतुराज गायकवाड - तुषार देशपांडेची दमदार कामगिरी, हैदराबादवर दणदणीत विजय


CSK vs SRH : पथिरानाचं भन्नाट प्लॅनिंग, भेदक यॉर्करवर मार्क्रमच्या दांड्या गुल, मॅच थांबवण्याची वेळ, थेट स्टम्प बदलावा लागला,पाहा व्हिडीओ