चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यात आयपीएलमधील 46 लढत पार पडली. चेन्नईच्या होम ग्राऊंडवर दोन्ही संघ आमने सामने आले. सनरायजर्स पॅट कमिन्सनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 212 धावा केल्या. चेन्नईच्या डावात कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या 98 धावा आणि डॅरिल मिशेलं 52 धावा महत्त्वाच्या ठरल्या. चेन्नईनं केलेल्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादला करता आला नाही. हैदराबादचा संघ 134 धावा करु शकला. चेन्नई सुपर किंग्जनं अशा प्रकारे स्पर्धेतील पाचव्या विजयावर नाव कोरलं.
हैदराबादचा सलग दुसरा पराभव
सनरायजर्स हैदराबादला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सनरायजर्स हैदराबादचा हा चौथा तर सलग दुसरा पराभव ठरला. चेन्नई सुपर किंग्जनं विजयासाठी समोर ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. तुषार देशपांडेनं दुसऱ्याच ओव्हरमध्ये हैदराबादच्या धोकादायक ट्रेविस हेडला बाद केलं. यानंतर लगेचच त्यानं अनमोलप्रीत सिंह शुन्यावर बाद केलं. तुषार देशपांडे यानेच त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला बाद करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. या धक्क्यांमधून हैदराबादचा संघ सावरु शकला नाही. यानंतर मार्क्रम आणि नितीशकुमार रेड्डी डाव सावरतात असं वाटत असतानाच हैदराबादला चौथा धक्का रवींद्र जडेजानं दिला. जडेजानं नितीशुकमार रेड्डीला आऊट केलं. यानंतर हैदराबादचे फलंदाज क्रमाकमानं बाद होत गेले. हैदराबादचा संघ 134 धावांवर बाद झाला.
तुषार देशपांडेच्या वादळात हैदराबादची फलंदाजी कोलमडली
मराठमोळ्या तुषार देशपांडेनं हैदराबादला दुसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये एकूण तीन धक्के दिले. हैदराबादचे सलामीवर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा या दोन्ही सलामीवीरांना तुषार देशपांडेनं बाद केलं. याशिवाय अनमोलप्रीतसिंहला देखील बाद केलं. यानंतर चेन्नईच्या मराठमोळ्या बॉलरनं हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सला देखील बाद करुन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तुषार देशपांडेनं चार विकेट घेतल्या,मुस्तफिजूर रहमान आणि मथिशा पथिरानानं प्रत्येकी दोन आणि रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी एक एक विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना होमग्राऊंड असलेल्या चेपॉकवर 212 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनं 98 धावांची खेळी केली. डॅरिल मिशेलनं 52 आणि शिवम दुबेनं 39 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड 20 व्या ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
संबंधित बातम्या :