चेन्नई : आयपीएलच्या (IPL 2024) 46 व्या मॅचमध्ये गतविजेती चेन्नई सुपर किंग्जनं  (Chennai Super Kings) पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 212  धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. तुषार देशपांडेनं हैदराबादला सुरुवातीलाच धक्के दिले. यानंतर  सनरायजर्स हैदराबादचा प्रमुख फलंदाज एडन मार्क्रमनं (Aiden Markram) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मथिशा पथिरानानं (Matheesha Pathirana Yorker) टाकलेल्या यॉर्करपुढं मार्क्रमचा निभाव लागला नाही. मार्क्रम 32 धावा करुन बाद झाला. 


मार्क्रमसाठी पथिरानानं जाळं टाकलं


चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं अकराव्या ओव्हरमध्ये बॉलिंगची धुरा मथिशा पथिरानावर सोपवली. कॅप्टननं ज्या कारणासाठी बॉलिंग दिली होती त्याप्रमाणं पथिरानानं कामगिरी पार पाडली. पथिरानानं ओव्हरचा पाचवा बॉल पहिल्यांदा वाईड टाकला. पथिरानानं टाकलेला हा बॉल बॅटसमनच्या लेक साईडनं गेल्यानं वाईड दिला गेला. हा बॉल टाकून पथिरानानं माईंड गेम खेळला. पथिरानानं वाईड बॉलनंतर थेट मार्क्रमला यॉर्कर टाकला आणि मार्क्रमकडे पाहत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 


पाहा व्हिडीओ






पथिरानानं टाकलेल्या यॉर्करवर मार्क्रम बाद झाला. पथिरानाचा यॉर्कर इतक्या भेदक होता की काही वेळ मॅच थांबवावी लागली. पंचांना थेट स्टम्प देखील बदलावा लागला.  स्टम्प बदलण्यासाठी काही काळासाठी मॅच थांबवावी लागली. 


चेन्नईच्या गोलंदाजांनी मॅच जिंकवली 


चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 विकेटवर 212  धावा केल्या होत्या. यामध्ये कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या 98 आणि डॅरिल मिशेलच्या 52 धावांचा समावेश होता. चेन्नईच्या गोलंदाजांनी 212 धावांचा बचाव यशस्वीपणे केला. चेन्नई सुपर किंग्जच्या तुषार देशपांडे, मुस्तफिजूर रहमान, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर आणि मथिशा पथिराना यांनी दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. सनरायजर्स हैदराबादच्या संघाला चेन्नईच्या गोलंदाजांनी 134 धावांवर ऑलआऊट केलं. हैदराबादचा संघ 19 व्या ओव्हरमध्येच सर्वबाद झाला. तुषार देशपांडेनं 4, मुस्तफिजूर  रहमान आणि मथिशा पथिरानानं  प्रत्येकी दोन तर शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी एक एक विकेट घेतली. 


 चेन्नईची गुणतालिकेत मोठी झेप


चेन्नई सुपर किंग्जनं स्पर्धेतील पाचव्या विजयासह नेट रनरेटच्या आधारावर गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या तर सनरायजर्स हैदराबाद आता चौथ्या स्थानावर पोहोचलं आहे. 


संबंधित बातम्या :


Will Jacks : 6,6,4,6,6 विल जॅक्सनं राशिद खानला अस्मान दाखवलं, गुजरातच्या प्रमुख गोलंदाजांना धू धू धुतलं, पाहा व्हिडीओ


CSK vs SRH : तुषार देशपांडेनं हैदराबादच्या फलंदाजीला सुरुंग लावला, धोकादायक ट्रेविस हेड-अभिषेक शर्माचा करेक्ट कार्यक्रम