Arjun Tendulkar Viral Viddeo in IPL 2023 : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) नुकतंच आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने 15 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला सामना खेळला. यानंतर दुसऱ्या सामन्यात अर्जुन मंगळवारी, 18 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरला. या सामन्यात त्या आयपीएल करिअरमधील पहिली विकेट घेत अर्जुनने इतिहास रचला. वेगवान गोलंदाज अष्टपैलू अर्जुनने या सामन्यात आपली छाप सोडली. दरम्यान, या सामन्या दरम्यानच्या त्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ केली असल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे.


अर्जुन तेंडुलकरने कॅमेरामनला दिली शिवी? 


माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्यामुळे अर्जुन तेंडुलकरवर कायमच सर्वांच्या नजरा असतात. अशातच आता अर्जुनच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ केल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अर्जुन डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. यावेळी कॅमेरामन त्याच्यावर कॅमेरा फिरतो आणि त्यानंतर अर्जुन शेजारी बसलेल्या व्यक्तीला काहीतरी सांगतो.


पाहा अर्जुन तेंडुलकरचा व्हायरल व्हिडीओ : 






मास्टर ब्लास्टर सचिनच्या 'लेका'चा व्हिडीओ व्हायरल


अर्जुनचा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या इनिंगचा आहे. अर्जुन डगआउटमध्ये बसलेला असतो आणि कॅमेरामनने अचानक त्याच्यावर कॅमेरा फोकस केला. यानंतर अर्जुन शेजारच्या खेळाडूला रागाने काहीतरी बोलताना दिसत आहे. लिप सिंकवरून अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ केल्याचा अंदाज सोशल मीडिया यूजर्स लावत आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं आहे की, "मी अर्जुनला शिवीगाळ करताना पाहिलं." दुसर्‍या यूजरने लिहिलं की, "जेव्हा अर्जुनवर कॅमेरा गेला, तेव्हा त्याने मला जाणूनबुजून दाखवलं असं म्हटलं का?"


अर्जुन तेंडुलकरचं आयपीएलमध्ये पदार्पण


आयपीएलच्या 16 व्या हंगामात मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये (IPL 2023) पदार्पण केलं. दीर्घ प्रतिक्षेनंतर अर्जुनालाही संधी मिळाली. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. अर्जुन तीन वर्षांपासून संघाचा भाग आहे. मागील दोन वर्ष तो बेंचवर होता. पण दीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या वर्षी त्याला मुंबईकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात अर्जुनने दोन षटकांच्या गोलंदाजीमध्ये 17 धावा दिल्या पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने एक गडी बाद केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs SRH : सचिन तेंडुलकरच्या 'लेका'ची दमदार कामगिरी, अर्जुनची आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिला विकेट