MS Dhoni IPL Record : क्रिकेटमधील सर्वात मोठा फिनिशर कोण? असे म्हटले की सर्वात आधी नाव येते एमएस धोनीचे... सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठा फिनिशर म्हणून महेंद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) नाव घेतले जाते. धोनीने अनेकदा सिद्धही केलंय. धोनीने आयपीएलच्या सोळाव्या हंगामातही फिनिशिंगचे काम चोख (Dhoni Master Finisher of IPL 2023) बजावलेय. राजस्थानविरोधात चेन्नईने सामना गमावला पण या सामन्यात अखेरच्या षटकात धोनीचे आक्रमक रुप दिसलं. बुधवारी धोनीने 17 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात धोनीने दोन षटकार लगावत आपणच बादशाह असल्याचे दाखवून दिले.
अखेरच्या षटकात धोनीसारखा कुणीच नाही...
आयपीएलमध्ये अखेरच्या षटकात धोनीसारखी विस्फोटक फलंदाजी कुणीच करत नसल्याचे अनेकदा सिद्ध झालेय. अखेरच्या षटकातील आकडेच धोनी किती मोठा फिनिशर आहे.. हे सांगतात. अखेरच्या षटकात आतापर्यंत धोनीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.. त्याशिवाय अखेरच्या षटकात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याचा पराक्रम धोनीने केलाय. धोनीने 20 व्या षटकात आतापर्यंत 693 धावांचा पाऊस पाडलाय.. या धावा इतर फलंदाजांच्या तुलनेत खूप जास्त आहे. धोनीने अखेरच्या षटकात आतापर्यंत 49 चौकार आणि 57 षटकार लगावले आहेत.. आतापर्यंत हा पराक्रम कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही.
चेन्नईसाठी धोनी 200 सामन्यात कर्णधार
धोनीने बुधवारी चेन्नईचा कर्णधार म्हणून 200 वा सामना खेळला. 200 सामन्यात एखाद्या संघासाठी नेतृत्व करणारा धोनी पहिलाच खेळाडू आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत एकाही खेळाडूला 200 सामन्यात नेतृत्व करता आलेले नाही. विराट कोहली एका संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. पण एखाद्या संघासाठी सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत चेन्नईसाठी आयपीएलमध्ये 200 सामन्यात नेतृत्व केलेय. त्याशिवाय चॅम्पियन्स लीग स्पर्धेत चेन्नईसाठी 14 सामन्यात नेतृत्व केलेय.
धोनीचे आयपीएल करिअर
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगमापासून खेळत आहे. 2008 मध्ये धोनीने चेन्नई संघाकडून नेतृत्व केले होते. धोनीने आतापर्यंत 238 आयपीएल सामने खेळले आहेत. यामधील 209 डावात फलंदाजी करताना धोनीने 39.34 च्या सरासरीने आणि 135.78 च्या स्ट्राइक रेटने पाच हजार पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत 24 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 इतकी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
MI vs SRH : सचिन तेंडुलकरच्या 'लेका'ची दमदार कामगिरी, अर्जुनची आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिला विकेट