AR Rehman in IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या भव्य सामन्यापूर्वी एक जंगी कार्यक्रम देखील याठिकाणी पार पडला.  यावेळी कार्यक्रमाला ऑस्कर विजेते म्यूझिक कंपोजर ए.आर. रहमानचा यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. पण रेहमान यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सने सर्वांनाच मंत्रमुग्ध करुन सोडलं. विशेषत: त्यांचं प्रसिद्ध गीत वंदे मातरम् याठिकाणी पुन्हा एकदा सादर कऱण्यात आलं. ज्याने पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकली. आयपीएलच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडीओलाही नेटकऱ्यांची तुफान पसंती मिळत आहेत.


पाहा एआर रेहमना यांचं मंत्रमुग्ध करणारं वंदे मातरम् - 



आयपीएल फायनलपूर्वी वर्ल्ड रेकॉर्ड


बॉलीवुड तारे-तारका स्टेजवर उतरल्या असून याच अंतिम सामन्याच्या समारोपादरम्यानएक वर्ल्ड रेकॉर्ड सामना सुरु होण्याआधीच झाला आहे. मैदानात एक भव्य अशी जर्सी आयपीएलतर्फे सादर करण्यात आली असून जगातील सर्वात मोठ्या मैदानात ही सर्वात मोठी जर्सी सादर करण्यात आल्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकमध्ये देखील करण्यात आली आहे. 


राजस्थानने निवडली फलंदाजी


राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या महासामन्यात संजूने प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या गुजरातसमोर ठेवून त्यांच्यावर दबाव टाकण्याच्या निर्धारात आहे. याशिवाय आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघात एक महत्त्वाचा बदल केला आहे. अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्यूसनला संधी दिली आहे. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाने नाणेफेक जिंकली असून त्यांनी मात्र एकही बदल संघात न करता खेळाडू मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.  


हे देखील वाचा-