Yuzvendra Chahal Video : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामी फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पाडलाय. बटलरकडे सध्या ऑरेंज कॅपही आहे. यंदाच्या हंगामात बटलरच्या आसपास एकही फलंदाज नाही. जोस बटलरने आतापर्यंत 16 सामन्यात 824 धावा चोपल्या आहेत. यावेळी जोस बटलरचा स्ट्राइक रेट 151.47 आहे तर सरासरी 58.86 इतकी राहिली आहे. यंदाच्या हंगामात जोस बटलरने चार शतकेही झळकावली आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच बटलरने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. राजस्थान रॉयल्समधील (Rajasthan Royals) फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) याबाबत एक मिश्किल वक्तव्य केलेय.
जोस बटलरने यंदाच्या हंगामात 800 धावा चोपल्या आहे. पण जर मी ओपनर असतो तर 1600 धावा चोपल्या असत्या, असे युजवेंद्र चहल म्हणालाय. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ने युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) हा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केलाय... दरम्यान, युजवेंद्र चहलने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 26 विकेट घेतल्या आहेत.
पाहा व्हिडीओ...
फायनलमध्ये कुणाचं पारडं जड?
गुजरातचा संघ पदार्पणातच यंदाच्या मोसमातला सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या फायनलमध्ये घेऊन गेलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरलाय. हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत १४ पैकी १० सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचं पारडं जड मानलं जातंय. इकडे संजू सॅमनसनच्या राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला.पण राजस्थानची 'रॉयल' ब्रिगेड दुसऱ्या क्वालिफायरमध्ये नेटानं लढली. आणि बंगलोरला हरवून राजस्थाननं आपला 14 वर्षांचा वनवास संपवला. तुम्हाला आठवत असेल की 2008 सालच्या पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स हाच संघ विजेता ठरला होता. पण त्यानंतर राजस्थानला एकदाही विजेतेपद सोडा पण अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळं यंदा तब्बल १४ वर्षांनी राजस्थान फायनमध्ये खेळताना दिसणार आहे.