Ajinkya Rahane in IPL 2023 : मुंबईकर अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या मैदानावर झंझावाती फलंदाजी केली. अजिंक्यने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच अजिंक्यने दमदार कामगिरी केली. 


मुंबईने दिलेल्या 158 धावांच्या माफक आव्हानाच पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे गोल्डन डक झाला.. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने सामन्याचे चित्र बदलले. अजिंक्य याने वानखेडे मैदानावर चोहोबाजूने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने 3 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पडाला. अजिंक्य फलंदाजी करताना भन्नाट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडही बघ्याच्या भूमिकेत होता. अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची खेळी केली. ऋतुराजसोबत त्याने 82 धावांची भागिदारी केली, यामध्ये अजिंक्य रहाणेचा वाटा 61 धावांचा होता. अजिंक्य रहाणेने एका षटकात तब्बल 23 धावा वसूल केल्या, त्यावरुन त्याच्या विस्फोटक फलंदाजीचा अंदाज लावू शकता. 


अजिंक्य रहाणे याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. याआधी हा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर होता. शार्दुल ठाकूरने आरसीबीविरोधात 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. रहाणेने हा विक्रम मोडीत काढत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. अजिंक्य रहाणेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेटकरी त्याच्या दमदार खेळीचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत आहेत. पाहा सोशल मीडियावर कोण काय म्हणाले... 














































आयपीएलमध्ये अजिंक्यची कामगिरी - 


आयपीएलधील 149 डावात 31 च्या सरासरीने अजिंक्य रहाणे याने 4135 धावा चोपल्या आहेत. अजिंक्यच्या नावावर दोन शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्याने 83 षटकार आणि 438 धावांचा पाऊस पाडलाय.