Arjun Tendulkar In IPL 2023 : मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये वानखेडे मैदानावर सामना रंगला आहे. धोनीने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघामध्ये मोठे बदल झाले आहे. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर आजच्या सामन्यात खेळत नाही. त्याच्याजागी जेसन बेहरनडॉर्फ याला संघात स्थान दिलेय. तर अर्जुन तेंडुलकर मुंबई इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत आहे. त्यामुळे अर्जुनला आज संधी मिळणार का? या चर्चेला उधाण आलेय. 


मागील दोन हंगामापासून अर्जुन तेंडुलकर मुंबई संघाचा सदस्य आहेत. पण त्याला अद्याप पदार्पण करता आलेले नाही. त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेले नाही. पण आजच्या सामन्यात त्याला मैदानावर उतरण्याची संधी मिळू शकते. जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीमुळे मुंबईची गोलंदाजी अतिशय कमकुवत जाणवत आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर याला मैदानावर उतरवले जाऊ शकते. अर्जुन तेंडुलकर इम्पॅक्ट पाडणार का?  अशी चर्चा रंगली आहे. 


चेन्नईविरोधात होणाऱ्या हायहोल्टेज सामन्यापूर्वी मुंबई संघाने कसून सराव केला होता. यामध्ये अर्जुन तेंडुलकर याच्या गोलंदाजीचे कौतुक झाले होते. मुंबईने आपल्या सोशल मीडियावरही अनेक फोटो पोस्ट केले, त्यामध्ये अर्जुन तेंडुलकर याचाही समावेश होता. त्यामुळे अर्जुनला आज प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार का? याची उत्सुकता लागली होती. अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही, पण इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत अर्जुनचा समावेश आहे. त्याला गोलंदाजीसाठी मैदानावर उतरवणार की फंलदाजीसाठी हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. रणजी चषकात त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. तो मागील काही वर्षांपासून मुंबईच्या संघासोबत आहे. त्याच्या खेळामध्ये मोठी सुधारणा झाल्याचे दिसतेय. गोलंदाजीसोबत तळाला तो मोठी फटकेबाजीही करतो. त्यामुळे मुंबई आज अर्जुनला मैदानावर उतरणावर का? अर्जुन तेंडुलकर आपला इम्पॅक्ट पाडणार का? या अशा चर्चा रंगल्या आहेत.