SRK on Andre Russell: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या पंधरावव्या हंगामातील आठवा सामना पंजाब आणि कोलकाता (KKR vs PBKS) संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याच्या संघानं सहा विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं आहे. कोलकाताचा हा आयपीएल 2022 मधील दूसरा विजय आहे. या सामन्यात आंद्रे रसल तुफानी फलंदाजी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. रसलची फलंदाजींनं बॉलिवूड अभिनेता आणि केकेआरचा सहसंघमालक शाहरुख खानचंही मन जिंकलं आहे. रसलच्या फलंदाजीवर शाहरूख खानंनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात आंद्रे रसलनं 31 चेंडूत 70 धावा केल्या. यात आठ षटकारांचा आणि 2 चौकारांचा समावेश आहे. रसलच्या या कामगिरीच्या जोरावर कोलकात्यानं पंजाबविरुद्ध सहा विकेट्स विजय मिळवला आहे. कोलकात्याच्या विजयानंतर शाहरुख खाननं ट्विटरच्या माध्यमातून खेळाडूंचं कौतुक केलं. "पुन्हा स्वागत माझ्या मित्रा रसल, केव्हापासून चेंडू एवढा उंच उडताना पाहिला नव्हता", अशा आशयाचं त्यानं ट्वीट केलं आहे.


शाहरूख खानचं ट्वीट-




नाणपेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाबच्या संघाचा डाव 18.2 षटकांत अवघ्या 137 धावांत आटोपला. पंजाबकडून भानुका राजपक्षाने 31 तर, कॅगिसो रबाडानं 25 धावांची खेळी केली. कोलकात्याकडून उमेशनं 23 धावांत 4 बळी घेतले.  पंजाबनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकात्याच्यानं 51 धावांवर चार विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आंद्रे रसलनं वादळी खेळी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha