IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरातचा 14 धावांनी विजय

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्यात लढत, पुण्याच्या मैदानावर आमनेसामने

नामदेव कुंभार Last Updated: 02 Apr 2022 11:23 PM
IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीला आणखी एक धक्का, अक्षर पटेल बाद
IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीला चौथा धक्का, ललीत यादव बाद

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीला चौथा धक्का बसला आहे. ललीत यादव 25 धावांवर बाद झाला आहे. 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : ऋषभ पंत-ललीत यादवने डाव सावरला

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates :  कर्णधार ऋषभ पंत आणि ललीत यादव यांनी दिल्लीचा डाव सावरला आहे. 11 षटकानंतर दिल्लीच्या तीन बाद 86 धावा...पंत आणि ललीत प्रत्येकी 25 धावांवर खेळत आहेत. दिल्ली कॅपिटल्स ला 55 चेंडूत 9.38 rpo प्रति ओवर सरासरी ने 86 धावांची गरज



 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीला तिसरा धक्का, मनदीप सिंह बाद

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : लॉकी फर्गुसनने दिल्लीला तिसरा धक्का दिला आहे. मनदीप सिंह 18 धावा काढून बाद झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सला 91 चेंडूत 9.09 rpo प्रति ओवर सरासरी ने 138 धावांची गरज आहे. 



 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीला दुसरा धक्का, सलामीचे फलंदाज तंबूत

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली संघाचे दोन्ही सलामी फलंदाज तंबूत परतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सला 95 चेंडूत 8.84 rpo प्रति ओवर सरासरी ने 140 धावांची गरज आहे. 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : शुबमन गिलचं अर्धशतक, गुजरातची 171 धावांपर्यंत मजल

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates  : सलामिवीर फलंदाज शुबमन गिल याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 171 धावांपर्यंत मजल मारली 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : शुबमन गिलची तुफानी फटकेबाजी

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : शुबमन गिलने तुफानी फटकेबाजी केली आहे. एका बाजूला विकेट पडत असताना गिलने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरातला तिसरा धक्का, पांड्या 31 धावांवर बाद

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : खलील अहमदने हार्दिक पांड्याला बाद करत दिल्लीला तिसरे यश मिळवून दिले. गुजरात 14 षटकानंतर तीन बाद 109 धावा

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : शुबमन गिलची अर्धशतकी खेळी, पांड्याची फटकेबाजी

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : शुबमन गिलची अर्धशतकी खेळी, पांड्याची फटकेबाजी

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : कुलदीपचा गुजरातला धक्का, विजय शंकर बाद

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates :  कुलदीप यादवने विजय शंकरला बाद करत गुजरातला दुसरा धक्का दिला आहे. आपल्या पहिल्याच षटकात कुलदीपने विकेट घेतली. विजय शंकर 13 धावांवर बाद झालाय

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरातचे 11 शिलेदार

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates :  शुबमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), विजय शंकर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, वरुण अॅरोन, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीचे 11 शिलेदार

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : पृथ्वी शॉ, टीम शेफर्ट, मनदीप सिंह, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), रोमेन प़वेल, ललीत यादव, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजूर रहमान  

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातची प्रथम फलंदाजी

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरातची ताकद, कमकुवत बाजू?

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. संघात सलामीवीरांचा प्रश्न काहीसा कठीण आहे. कारण नुकताच जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकट्या शुभमनवर सलामीची जबाबदारी आहे.

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीची ताकद अन् कमजोरी काय?

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : दिल्लीची सर्वात मोठी ताकद सलामी जोडी होऊ शकते. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर हे विस्फोटक फलंदाज कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यास सक्षम आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतचा फॉर्म दिल्लीसाठी जमेजी बाजू आहे. गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, दिल्लीकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकुर आणि खलील अहमद यासारखे धुरंधर गोलंदाज दिल्लीकडे आहेत. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नाहीत. त्याशिवाय वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीतून सावरलेला नाही. आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स आहे. 

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : सात वाजता नाणेफेक होणार

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates :  गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची नाणेफेक सात वाजता होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर लढत होत आहे. 

पार्श्वभूमी

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत. 


गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. गुजरात आणि दिल्लीचा संघ विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. 


पिच रिपोर्ट - 
पुण्यातील एमसीए क्रिकेटचं मैदान सुरुवातीला फलंदाजीसाठी पोषक आहे. त्यानंतर येथे फिरकी गोलंदाजांचा दबदबा राहतो. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मदत मिळतो. दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 80 टक्के जिंकला आहे. 


दिल्लीची ताकद अन् कमजोरी काय?
दिल्लीची सर्वात मोठी ताकद सलामी जोडी होऊ शकते. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर हे विस्फोटक फलंदाज कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यास सक्षम आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतचा फॉर्म दिल्लीसाठी जमेजी बाजू आहे. गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, दिल्लीकडे एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकुर आणि खलील अहमद यासारखे धुरंधर गोलंदाज दिल्लीकडे आहेत. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नाहीत. त्याशिवाय वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीतून सावरलेला नाही. आयपीएलमध्ये तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स आहे. 




 



गुजरातची ताकद, कमकुवत बाजू?
गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांच्याकडे असणारा बोलिगं अटॅक त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण संघात जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान आहे. सोबत वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी सारखे दिग्गज आहेत. नवखा पण उत्तम असा अल्झारी जोसेफही गुजरातमध्ये असून अनुभवी जयंत यादव आणि आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणारा राहुल तेवतिया संघात आहे. संघात सलामीवीरांचा प्रश्न काहीसा कठीण आहे. कारण नुकताच जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे एकट्या शुभमनवर सलामीची जबाबदारी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.