KKR, Mitchell Starc : ईडन गार्डनच्या मैदानावर कोलकाता आणि हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. अखेरच्या चेंडूपर्यंत चालेलल्या या सामन्यात कोलकात्यानं (KKR) बाजी मारली. क्लासेनच्या फटकेबाजीमुळे हा सामना हैदराबादच्या पारडण्यात गेला होता. पण युवा हर्षित राणा यानं अखेरच्या षटकात भेदक मारा केला. पण कोलकात्यासाठी या सामन्यात डोकेदुखी ठरली ती मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) गोलंदाजी. मिचेल स्टार्कसाठी कोलकात्यानं 24.75 कोटी रुपये खर्च केले...पण पहिल्याच सामन्यात स्टार्कची गोलंदाजी कोलकात्यासाठीच महागडी ठरली. हैदराबादच्या फलंदाजांनी स्टार्कची धुलाई करत लाज काढली. मिचेल स्टार्कनं 4 षटकात 50 पेक्षा जास्त धावा चोपल्या. महत्वाच्या षटकात तर मिचेल स्टार्कने 26 धावा खर्च केल्या. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे, पण त्याची गोलंदाजीच कोलकात्यासाठी महागडी ठरत आहे. 


एकाच षटकात स्टार्कनं खर्च केल्या 26 धावा - 


कर्णधार श्रेयस अय्यरनं मिचेल स्टार्क याला महत्वाचं षटक दिलं. 2 षटकात 39 धावांची गरज होती. मिचेल स्टार्क 19 वं षटक टाकायला आला. स्टार्कच्या या षटकाचा क्लासेननं समाचार घेतलं.. हैदराबादच्या फलंदाजांनी स्टार्कच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला. हेनरिक क्लासेन यानं पहिल्याच चेंडूवर गगणचुंबी षटकार ठोकला. स्टार्कने दुसरा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर स्टार्कनं चेंडू वाईट टाकला. दोन षटकात सात धावा दिल्या.. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर क्लासेन यानं लागोपाठ दोन षटकार मारले.  पुढच्या चेंडूवर क्लासेन यानं एक धाव घेतली.  पाच चेंडूत स्टार्कने 20 धावा खर्च केल्या होत्या. अखेरचा चेंडू शाहबाजला टाकला... पण त्यावर शाहबाजनं गगनचुंबी षटकार ठोकला. मिचेल स्टार्कच्या 19 व्या षटकात हैदराबादच्या फलंदाजांनी 26 धावा वसूल केल्या. महागड्या स्टार्कची गोलंदाजी कोलकात्यासाठी महागडी ठरली.  




महागड्या स्टार्कची गोलंदाजी ठरली महागात - 


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज आहे. लिलावात मिचेल स्टार्कसाठी कोलकात्यानं 24.75 कोटी रुपये खर्च केले.  हैदराबादच्या फलंदाजांनी त्याची गोलंदाजी फोडून काढली. शनिवारी मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेन आणि शाहबाज अहमद यांनी धावांची पाऊस पाडला. पण पहिल्याच सामन्यात त्याची गोलंदाजी फेल ठरली. मिचेल स्टार्क यानं 4 षटकात तब्बल 53 धावा खर्च केल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. मिचेल स्टार्क यानं 19 वं षटक टाकलं, पण त्या षटकात त्याला खूप मार बसला. मिचेल स्टार्कच्या या षटकात क्लासेन आणि शाहबाज यांनी तब्बल 26 धावा वसूल केल्या.