DC vs PBKS: Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 174 धावा केल्या. या प्रत्युत्तरात पंजाबने 4 विकेट्स राखत सामना जिंकला. या सामन्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सचा (Punjab Kings) 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 174 धावा केल्या. या प्रत्युत्तरात पंजाबने 4 विकेट्स राखत सामना जिंकला. या सामन्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्जच्या डावात प्रभसिमरन सिंग तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी कुलदीप यादव संघाचे 10 वे षटक टाकत होता. षटकाच्या पहिल्याच चेंडूनंतर कर्णधार ऋषभ पंतने कुलदीपला हिंट दिली. चेंडू टाकत राहा, तुला विकेट मिळेल असं ऋषभ पंत कुलदीपला म्हणाला. स्टंप माईकवर हे सर्व रेकॉर्ड झाले. विशेष म्हणजे पुढच्याच चेंडूवर कुलदीपने विकेट घेतली. प्रभासिमरन 17 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार मारले.
कुलदीप यादवची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 74 सामन्यात 73 विकेट घेतल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. हा सामना 28 मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. यानंतर तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. 3 एप्रिल रोजी दिल्ली आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.
पंजाब किंग्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. दिल्लीच्या सातत्यानं विकेट पडत गेल्या. दिल्लीचा संघ 150 धावा करेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, दिल्लीचा युवा खेळाडू अभिषेक पोरेल यानं 10 बॉलमध्ये 31 धावा केल्यानं पंजाब किंग्जपुढं विजयासाठी 175 धावांचं आव्हान उभं केलं.
पंजाब किंग्सची विजयानं सुरुवात-
पंजाब किंग्सनं 2024 च्या आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पंजाब किंग्सनं चार विकेट राखून विजय मिळवला. सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं विजय मिळवला. शिखर धवन 22, प्रभासिमरन सिंग 26, सॅम करन 63 आणि लिविंस्टन याच्या 36 धावांच्या जोरावर पंजाबनं 4 विकेटनं विजय मिळवला.