MS Dhoni IPL : चेपॉकच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 167 धावांपर्यंत मजल मारली. आघाडीच्या फलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट फेकल्या.. त्यामुळे पुन्हा एकदा धोनी चेन्नईच्या मदतीला धावून देला. धोनीने अवघ्या नऊ चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. या छोटेखानी खेळीत धोनीने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. धोनीच्या षटकाराला स्टेडिअममधील प्रेक्षकांनी एन्जॉय केले. त्याशिवाय सोशल मीडियावरही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटल्यात.. 


 रायडू आणि दुबे बाद झाल्यानंतर जाडेजा आणि धोनीने चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी झटपट धावांचा पाऊस पाडला. धोनी आणि जाडेजा यांनी 18 चेंडूत 38 धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रविंद्र जाडेजाने 16 चेंडूत 21 धावांचे योगदान दिलेय. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. धोनीने 9 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. धोनी आणि जाडेजा यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे चेन्नईचा डाव 167 पर्यंत पोहचला.  


कर्णधार एमएस धोनी आणि रविंद्र जाडेजा यांची फटकेबाजी आणि शिवम दुबे याच्या वादळामुळे चेन्नईने 167 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 167 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने तीन विकेट घेतल्या. धोनीने अवघ्या 9 चेंडूत 20 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्स, पोस्ट अन् लाईक्सचा वर्षाव होतोय.