Mumbai Indians : आयपीएलचा सोळावा हंगाम उत्तारर्धाकडे झुकला आहे. प्रत्येक सामना रोमांचक होत आहे. काही रंगतदार आणि श्वास रोखायला लावणाऱ्या लढतीमुळे चर्चेत राहिले तर काही सामने वादामुळे चर्चेत होते. आरसीबी आणि मुंबई यांच्यातील सामनाही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला पंचांनी बाद दिल्याच्या निर्णायामुळे सध्या चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. क्रीडा चाहत्यांसह माजी खेळाडूंनीही आपले मत व्यक्त करत डीआरएस वर प्रश्न उपस्थित केलाय. 


रोहित शर्मा आणि ईशान किशन फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. मुंबई 200 धावांचा पाठलाग करत होती. सलामी जोडीने वादळी सुरुवात केली होती. हसरंगाच्या चेंडूला रोहित शर्मा याने पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी चेंडू रोहित शर्मा याच्या पॅडला लागला. खेळाडूंनी अपील केल्यानंतर मैदानावरील पंचांनी नाबाद दिले.. आरसीबीच्या खेळाडूंनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. डीआरएस निर्णयात तिसऱ्या पंचांनी रोहित शर्माला बाद दिले.. त्यानंतर सोशल मीडियावर राडा सुरु झाला..


अनेकांनी आयसीसीच्या नियमाचा हवाला देत रोहित शर्मा नाबाद असल्याचे सांगितेल. आयसीसीच्या LBW नियमांनुसार, जर चेंडू पॅडला लागत असेल अन् त्यानंतर स्टम्पपर्यंत पोहचण्याचे तीन मीटर अंतर असेल तर फलंदाज नाबाद असतो...रोहित शर्माच्या बाबतीत हे अंतर तीन मीटरपेक्षा जास्त असल्याचे दिसतेय. 


























यंदा रोहित शर्माचा फॉर्म खराबच - 


रोहित शर्मा याचा यंदाचा फॉर्म अतिशय खराब आहे. रोहित शर्मा याला मागील पाच डावात दुहेरी धावसंख्याही ओलांडता आलेली नाही. रोहित शर्मा याने 11 डावात फक्त 191 धावा केल्या आहेत. रोहित शर्माची सरासरी त्याच्या लौकिकास साजेशी नाही. यंदा रोहित शर्मा याने 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 17 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. रोहित शर्मा याला फक्त एक अर्धशतक झळकावता आलेय.  यंदा रोहित शर्मा याने दहा षटकार आणि 21 चौकार लगावले आहेत. त्याशिवाय फिल्डिंग करताना फक्त एक झेल घेतलाय. रोहित शर्माची यंदाची सर्वोच्च धावसंख्या 65 आहे..  


आणखी वाचा :   


धोनी म्हातारपणी कसा दिसेल, उतारवयातील रोहित ओळखता येईल? AI ने बनवलेले फोटो बघाच!


IPL 2023 : चढाओढ फक्त तुमच्या डोक्यात, खरी स्पर्धा... नवीन उल हकनंतर विराट कोहलीची पोस्ट चर्चेत 


Video: 23 वर्षीय नवीन उल हक, केवळ विराटच नव्हे तर आफ्रिदी, परेरा आणि डॉर्सीलाही भिडला!


पुन्हा भिडले... ! गौतम गंभीर-नवीन अन् लखनौने विराट कोहलीला डिवचले, किंगचे चाहते भडकले