Rohit Sharma, IPL 2023 : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याची बॅट शांतच आहे. मागील दोन वर्षांपासून रोहित शर्मा याला आयपीएलमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा याला गेल्यावर्षी 300 धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही रोहित शर्मा याची बॅट शांतच असल्याचे दिसतेय. रोहित शर्मा फारकाळ मैदानावर स्थिरावत नसल्याचे दिसतेय. मागील पाच डावांचा विचार केला तर रोहित शर्मा याला एकदाही दुहेरी आकडेवारी गाठता आली नाही. 

यंदा रोहित शर्माचा फॉर्म खराबच - 

रोहित शर्मा याचा यंदाचा फॉर्म अतिशय खराब आहे. रोहित शर्मा याला मागील पाच डावात दुहेरी धावसंख्याही ओलांडता आलेली नाही. रोहित शर्मा याने 11 डावात फक्त 191 धावा केल्या आहेत. रोहित शर्माची सरासरी त्याच्या लौकिकास साजेशी नाही. यंदा रोहित शर्मा याने 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 17 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. रोहित शर्मा याला फक्त एक अर्धशतक झळकावता आलेय.  यंदा रोहित शर्मा याने दहा षटकार आणि 21 चौकार लगावले आहेत. त्याशिवाय फिल्डिंग करताना फक्त एक झेल घेतलाय. रोहित शर्माची यंदाची सर्वोच्च धावसंख्या 65 आहे..  

गेल्यावर्षी रोहितची कामगिरी कशी होती ---

गतवर्षीही रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. रोहित शर्माने गेल्यावर्षी 14 सामन्यात 268 धावा केल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे.. गेल्यावर्षी रोहित शर्माला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. गेल्यावर्षी रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या 48 इतकी होती. रोहित शर्माने गेल्यावर्षी 19 च्या सरासरकीने आणि 120 च्या स्ट्राईक रेटने 268 धावा केल्या होत्या. गेल्यावर्षी रोहित शर्माने 13 षटकार आणि 28 चौकार लगावले होते. रोहित शर्माने गेल्यावर्षी फक्त सात झेल घेतले होते. 

आयपीएलमधील रोहित शर्माची कामगिरी कशी ?

रोहित शर्मा याने 238 सामन्यात 6070 धावा केल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि 41 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये 250 षटकार लगावले आहेत. रोहित शर्माच्या बॅटमधून 540 चौकार निघाले आहेत.

आरसीबीबरोबर वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यापूर्वीच्या दहा सामन्यातील रोहित शर्मा याची कामगिरी----

S. No. Score Balls 4s 6s Opposition Ground
             
1 0 3 0 0 CSK Chennai
2 0 3 0 0 PBKS Mohali
3 3 5 0 0 RR Mumbai (WS)
4 2 8 0 0 GT Ahmedabad
5 44 27 4 3 PBKS Mumbai (WS)
6 28 18 6 0 SRH Hyderabad
7 20 13 1 2 KKKR Mumbai (WS)
8 65 45 6 4 DC Delhi
9 21 13 3 1 CSK Mumbai (WS)
10 1 10 0 0 RCB Bengaluru

 

रोहित शर्मा यंदा खराब फॉर्ममध्ये आहे. नेटकऱ्यांनी रोहित शर्मा याच्यावर टीकेची झोड उडवली आहे.