IPL 2022 : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आज सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा यांच्यात पहिला सामना खेळवला गेला आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रकाचा विचार करता सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत. 


यंदा आयपीएलच्या लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळवले जाणार असून 27 तारखेला अर्थात उद्या पंजाब विरुद्ध आरसीबी असा पहिला सामना याठिकाणी होणार आहे. दरम्यान आयपीएल सामन्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस सज्ज झाले असून नवी मुंबईत यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.


1300 पोलीस तैनात


डी वाय पाटील मैदानात एकूण 20 सामने खेळले जाणार आहेत. यातील 4 सामने दिवसा आणि 16 सामने सायंकाळी खेळविण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलिस यासाठी कडक बंदोबस्त तैनात करणार आहे. यासाठी 3 पोलीस उपायुक्त, 12 सहाय्यक पोलीस उपायुक्त, 45 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक आणि 1100 पोलीस कर्मचारी असे तब्बल 1300 पोलिस अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत. यासोबत राज्य राखीव दलाचे 100 जवान राखीव राहणार आहेत. नवी मुंबई पोलिसांची 2 जलद गती पथक, 2 दंगल नियंत्रण पथक रिसर्व कंट्रोल रूम ला राहणार असून साध्या वेशात गुन्हे शाखा आणि इतर शाखांचे 150 पेक्षा अधिक कर्मचारी देखील तैनात असणार आहेत.


हे देखील वाचा-