IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली असून श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरतील. यंदाच्या हंगामातील हा पहिला सामनाच असल्याने सर्वचजण खूप उत्साही दिसत आहेत. यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. त्यामुळे सामने आणखी चुरशीचे होऊ शकतात. त्यात यंदा महालिलाव झाल्यामुळे सर्व संघात बरेच बदल देखील झाले आहेत. त्यामुळे या बदलानंतर आता कोणता संघ कोणत्या खेळाडूच्या खेळीमुळे तारला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष होते.तर या बहुरप्रतिक्षित सामन्यात कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत यावर एक नजर फिरवूया...
चेन्नईचे अंतिम 11
डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथाप्पा, रवींद्र जाडेजा, एम एस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, अॅडम मिल्ने.
कोलकाता अंतिम 11
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.
आतापर्यंत चेन्नई विरुद्ध कोलकाता
चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यातील 18 सामन्यात चेन्नईच्या संघानं कोलकात्याला पराभूत केलंय. तर, केवळ 9 सामन्यात कोलकात्याला चेन्नईला पराभूत करता आलंय. या आकडेवारीनुसार, चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी
- IPL 2022 : आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने
- IPL 2022, CSK vs KKR : सर रवींद्र जाडेजापुढे श्रेयस अय्यरचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha