मुंबई : उमेश यादवसाठी (Umesh Yadav) आयपीएल 2024 साठी गुजरात (Gujarat) आणि हैदाराबाद (Hydrabad) संघामध्ये बिडिंग झालं. त्यामध्ये दिल्लीनेही (Delhi) उडी घेतली. 5 कोटींपेक्षा जास्त बोली लावल्यानंतर हैदराबादने माघार घेतली. त्यामुळे गुजरातने उमेश यादवला 5 कोटी 80 लाख रुपयात खरेदी केले. उमेश यादवची बेस प्राईज 2 कोटी इतकी होती. 

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यावर यंदाच्या आयपीएलच्या मोसमात विक्रमी बोली लागली.  गुजरात टायटन्स संघाने त्याला खरेदी केलं आहे. त्यासाठी गुजरातसोबत हैदराबाद देखील मैदानात होतं. पण यामध्ये गुजरातने बाजी मारली. दरम्यान सध्या 

2010 पासून खेळतोय आयपीएल

उमेश यादव 2010 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 134 सामन्यांत 136 विकेट घेतल्या आहेत. उमेश फॉर्ममध्ये असल्यास कोणत्याही आक्रमक फलंदाजीला फाटा देऊ शकतो. तो डावाच्या सुरुवातीला शानदार गोलंदाजी करतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 12 सामन्यात 16 विकेट घेतल्या. 

मिचेल स्टार्कवर सर्वाधिक बोली

मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली.  मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. 

पॅट कमिन्सही ठरला महागडा खेळाडू

 पॅट कमिन्स आजवरच्या आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं 20 कोटी 50 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली आहे. दरम्यान, यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली सॅम करनवर लावण्यात आली होती. सॅम करनवर पंजाबनं 18 कोटी रुपयांची बोली लावली होती. 

यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी

यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

आयपीएलचा लिलाव कुठे ?

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील  कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

हेही वाचा : 

ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स IPL च्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू; सनरायझर्स हैदराबादची विक्रमी बोली