अहमदनगर : राज्यातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक देशभरातून दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाय योजना (Shirdi Sai Baba Mandir Security) संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडून राबवली जाते. या सुरक्षेतील उपाय म्हणून साई मंदिर आणि साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबई येथील इसमाने रिल बनविण्यासाठी साई मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर येतात त्याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई


शिर्डीतील साईमंदिरावर ड्रोन उडवण्यास बंदी असतानाही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथील एका तरूणाने रील बनवण्यासाठी ड्रोन उडवल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. 


मुंबईतील देव दोडीया या तरूणाने रील बनवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याने त्याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई मंदिराशेजारी असलेल्या हॉटेलच्या टेरेसवरून ड्रोन उडवत या तरूणाने बनवलेले रील्स इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 


सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 


काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं. त्यातच आता साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्याची घटना समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. 


जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साई भक्तांसाठी नवीन वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण झालं. मात्र गेल्या 19 वर्षांपासून पिंपळवाडी रोडवर असणाऱ्या जुन्या दर्शन रांगेतून साईभक्त साई मंदिरात जात होते. नवीन दर्शन रांग सुरू झाल्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या मागणीनंतर अखेर जुनी दर्शन रांग हटवून हा रस्ता आता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.


शहरातील पिंपळवाडी रोडवर गेल्या 19 वर्षांपासून एका बाजूच्या रस्त्याचा वापर हा दर्शन रांगेसाठी केला जात होत होता. नवीन दर्शन रांग सुरू झाल्यावर हा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. अखेर ती मागणी आता मान्य करण्यात आली असून जुनी दर्शन रांग हटवण्याच काम सुरू झाले आहे. लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल. 


ही बातमी वाचा: