जयपूर : इंडियन प्रीमियर लीग 2019 साठी जयपूर येथे आज (18 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. आजच्या लिलावात मोठमोठ्या दिग्गजांना बाजूला सारत नवोदित खेळाडूंनी करोडो रुपयांची लूट केली. आजचा दिवस हा वरुण चक्रवर्ती आणि जयदेव उनाडकट यांचा असल्याचे पहायला मिळाले. या दोघांसाठी 8.40 कोटी रुपयांची बोली लागली.


वरुण चक्रवर्ती याला किंग्ज इलेव्ह पंजाबने 8.40 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले तर जयदेव उनाडकटसाठी रायस्थान रॉयल्सच्या संघमालकांनी 8.40 कोटी रुपये मोजले. तर दुसऱ्या बाजूला ब्रॅन्डन मॅक्यूलम, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, चेतेश्वर पुजारा,नमन ओझा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघमालकांनी रुची दाखवली नाही.

आयपीएलच्या 12 व्या सीझनच्या लिलावात एकूण 350 खेळाडूंचा समावेश असून त्यात 228 भारतीय आणि 133 परदेशी आहेत. जयपूरमध्ये आज या खेळाडूंवर आयपीएलच्या 8 फ्रॅन्चायजींनी बोली लावली.

जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स - 8 कोटी 40 लाख
वरुण चक्रवर्ती - किंग्ज इलेव्हन पंजाब - 8 कोटी 40 लाख
सॅम करेन - किंग्ज इलेव्हन पंजाब - 7 कोटी 20 लाख
कॉलिन इन्ग्राम - दिल्ली कॅपिटल्स - 6 कोटी 40 लाख
कोलकाता नाईट रायडर्स- कार्लोस ब्रॅथवेट - 5 कोटी
अक्षर पटेल - दिल्ली कॅपिटल्स - 5 कोटी
मोहित शर्मा - चेन्नई सुपरकिंग्ज - 5 कोटी
शिवम दुबे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 5 कोटी
प्रभसिमरन सिंह - किंग्ज इलेव्हन पंजाब - 4 कोटी 80 लाख
मोहम्मद शमी - किंग्ज इलेव्हन पंजाब - 4 कोटी 80 लाख
हेटमायर - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - 4 कोटी 20 लाख
वरुण अॅरॉन : राजस्थान रॉयल्स : 2 कोटी 40 लाख
जॉनी बेयरस्टो : सनरायझर्स हैदराबाद : 2 कोटी 20 लाख
लसिथ मलिंगा : मुंबई इंडियन्स : 2 कोटी
हनुमा विहारी : दिल्ली कॅपिटल्स :  2 कोटी रुपये
रिद्धिमान सहा - हैदराबाद सनरायझर्स - 1 कोटी 20 लाख
इशांत शर्मा : दिल्ली कॅपिटल्स : 1 कोटी 10 लाख
युवराज सिंह : मुंबई इंडियन्स : 1 कोटी
मार्टिन गप्टिल - हैदराबाद सनरायझर्स - 1 कोटी
सर्फराज खान - किंग्ज इलेव्हन पंजाब - 25 लाख
या खेळाडूंना कोणत्याही संघाने खरेदी केले नाही
शॉन मार्श
हाशिम अमला
अँजेलो मॅथ्यूज
कोरी अँडरसन
परवेझ रसूल
जेसन होल्डर
डेन स्टेल
मॉर्ने मॉर्कल
ब्रॅन्डन मॅक्यूलम
ख्रिस वोक्स
ख्रिस जॉर्डन
चेतेश्वर पुजारा
नमन ओझा