Aarati Kedar in Womens IPL : अहमदनगर जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आरती केदार या तरुणीने थेट IPL स्पर्धेत धडक मारली आहे. पाथर्डीच्या हात्राळ सारख्या छोट्याशा गावात महिला क्रिकेटसाठी कोणतही वातावरण नसताना आरती केदार हिनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेत क्रिकेट सारख्या मोठ्या स्पर्धेच्या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करून यश मिळवलं आहे. 


आरती पाथर्डीच्या हात्राळ गावातील पदवी शिक्षण घेते.  मनापासून क्रिकेटची आवड असली तरी प्रत्यक्षात 2014 पासून क्रिकेट खेळू लागली. खेळातील सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर  हात्राळ सारख्या छोट्या गावात सराव करूनही महाराष्ट्र टीम मध्ये आपलं स्थान निश्चित केलय...नुकत्याच पोंडीचेरी येथे झालेल्या महिला रणजी सामन्यात आरतीने सर्वाधिक विकेट घेण्याची कामगिरी केली... याच कामगिरीच्या जोरावर आता आरतीची BCCI कडून  IPL स्पर्धेतील व्हेलॉसिटी संघात निवड करण्यात आली आहे.


शेतकरी  कुटुंबातील आरती आपल्या गावात फारशा सुविधा नसल्या तरी क्रिकेटसाठी  रोज चार तासाचा सायकल प्रवास करून पाथर्डी येथे सरावासाठी येत होती. ग्रामीण भागातील अनेक परिस्थितीला आणि विरोधाला तोंड देत तिने आपला सराव आणि मेहनत कायम ठेवला. त्यामुळे तिला हे यश प्राप्त झाल्याचं तिचे प्रशिक्षक सांगतात. पाथर्डी शहरासाठी भारताची जर्षि मिळवण्याचे स्वप्न आमचे आहे आणि आरती हे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास पाथर्डीत ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


ग्रामीण भागातील मुलींना अनेक क्षेत्रामध्ये आपलं नाव करण्याची इच्छा असते. मात्र सभोवतालची परिस्थिती ही पोषक नसल्याने त्या काही करत नाहीत. मात्र कोणताही न्यूनगंड न बाळगता मेहनत आणि जिद्दीच्या जोरदार कोणत्याही क्षेत्रात यश मिळतं हेच जाणून घेतलं पाहिजे आणि यश मिळवले पाहिजे हाच संदेश तिनं दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या



IPL Points Table 2022 : आयपीएल पॉईंट टेबलमध्ये चुरस वाढली; शेवटच्या टप्प्यात काय आहे स्थिती