IPL Points Table 2022 Latest Updates : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात राजस्थाननं लखनौवर विजय मिळवला. या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं या आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने गमावले आहेत. त्यांनी 13 पैकी 10 सामने जिंकत गुजरातनं 20 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर राजस्थानचा संघ आठपैकी आठ सामने जिंकत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. लखनौनं देखील आठ सामने जिंकले आहेत ते 16 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. 

IPL 2022 पॉइंट्स टेबल:

क्रमांक संघ सामने विजय पराभव पॉईंट्स
1 GT 13 10 1 20
2 RR 13 8 5 16
3 LSG 13 8 5 16
4 RCB 13 7 6 14
5 DC 12 6 6 12
6 KKR 13 6 7 12
7 PBKs 12 6 6 12
8 SRH 12 5 7 10
9 CSK 13 4 9 8
10 MI 12 3 9 6
 

गुजरात प्लेऑफसाठी पात्र राजस्थान, लखनौचंही जवळपास निश्चित 

हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स हा प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरला. 13 पैकी 10 सामने जिंकत गुजरातनं 20 गुणांसह प्ले ऑफमध्ये निर्विवादपणे प्रवेश केला आहे.  राजस्थान आणि लखनौ सुपर जायंट्स प्रत्येकी 16 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत. त्यांचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित आहे मात्र त्यांना पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. हा सामना हरल्यास दोन्ही संघाला बंगळुरु आणि दिल्लीच्या पराभवाची वाट पाहावी लागणार किंवा नेट रनरेटचा आधार घ्यावा लागणार आहे.  आता खरी चुरस असणार आहे ती बंगळुरु आणि दिल्लीमध्ये.

चेन्नई आणि मुंबईचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. तर हैदराबाद आणि कोलकात्याचं देखील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. प्लेऑफमधून बाहेर जाणारा मुंबई पहिला संघ आहे. त्यानंतर चेन्नईचा देखील पत्ता कट झाला आहे.  कोलकात्याचाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमीच आहे. कोलकात्याचा एक सामना बाकी आहे. त्यांचे सध्या 12 गुण आहेत. त्यांनी शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील. त्यांच्या तुलनेत बंगळुरु आणि दिल्ली सध्या वरचढ दिसत आहे. हैदराबादच्या संघाचीही स्थिती सध्या बिकट आहे. पंजाबकडे संधी आहे मात्र त्यांना इतरांच्या जय पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे.  

चहलकडे पर्पल कॅप

युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. त्याने खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये तब्बल 24 गड्यांना माघारी धाडलं आहे. हसरंगानं 13 सामन्यात 23 बळी घेतले आहेत.  तर कगिसो रबाडानं 11 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या स्थानावर 18 विकेट्स घेत मोहम्मद शामी आहे तर हर्षल पटेलनंही 18 विकेट्स घेतल्या आहेत तो पाचव्या स्थानावर आहे.  

बटलरकडे ऑरेंज कॅप

तर सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप ही राजस्थानच्या जोस बटलरकडे कायम आहे. 13 सामन्यात 627 धावा करणाऱ्या बटलरनं या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या नंतर केएल राहुलनं 13 सामन्यात 469 धावा केल्या आहेत. डेविड वॉर्नर 427 धावा बनवत तिसऱ्या स्थानी आहे.  बटलरनं यंदाच्या आयपीएलमध्ये तीन शतकं ठोकली आहेत तर राहुलनं दोन शतकं झळकावलीत.