IPL 2021 MI vs SRH LIVE Score : मुंबईची हैदराबादवर 13 धावांनी मात
IPL 2021 MI vs SRH LIVE Cricket Score : चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे.
मुंबईची हैदराबादवर 13 धावांनी मात
IPL 2021 MI vs SRH LIVE Score : हैदराबादला तिसरा धक्का, कर्णधार वॉर्नर धावबाद, हैदराबादला विजयासाठी 36 चेंडूत 49 धावांची गरज
IPL 2021 MI vs SRH LIVE Score : पोलार्डच्या फटकेबाजीनं मुंबईच्या दीडशे धावा, हैदराबादला विजयासाठी 151 धावांची गरज https://marathi.abplive.com/sports/ipl-2021-live-cricket-score-mi-vs-srh-ipl-match-live-updates-mumbai-indians-vs-sunrisers-hyderabad-t20-scorecard-982684
मुंबईला पाचवा झटका, ईशान किशननंतर हार्दिक पांड्या बाद
IPL 2021 MI vs SRH LIVE Score : मुंबईला तिसरा झटका, डी कॉक 40 धावांवर बाद, मुंबईच्या 100 धावा पूर्ण, पोलार्ड आणि ईशान किशन मैदानात
https://marathi.abplive.com/sports/ipl-2021-live-cricket-score-mi-vs-srh-ipl-match-live-updates-mumbai-indians-vs-sunrisers-hyderabad-t20-scorecard-982684
IPL 2021 MI vs SRH LIVE Score : मुंबईला दोन धक्के, कर्णधार रोहित पाठोपाठ सूर्यकुमार यादवही बाद, 8.3 षटकानंतर मुंबईची स्थिती 2 बाद 71 धावा
https://marathi.abplive.com/sports/ipl-2021-live-cricket-score-mi-vs-srh-ipl-match-live-updates-mumbai-indians-vs-sunrisers-hyderabad-t20-scorecard-982684
IPL 2021 MI vs SRH LIVE Score : मुंबईच्या 50 धावा पूर्ण, सहा षटकानंतर मुंबईचा स्कोर बिनबाद 53 धावा, रोहित-डीकॉकचा जम बसला
संघाच्या कामगिरीसोबत विशेष लक्ष असेल ते हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि मुंबईचा धडाकेबाज कायरन पोलार्डच्या कामगिरीकडे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आपल्या विक्रमापासून काही पावलं दूर आहेत. वॉर्नरने जर आज अर्धशतक ठोकले तर आयपीएलमध्ये 50 अर्धशतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. या यादीत दुसऱ्या नंबरवर शिखर धवन आहे. शिखरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 42 अर्धशतके झळकावली आहेत. तर वॉर्नरला आणखी एक विक्रम खुनावत आहे. वॉर्नरला 200 षटकार पूर्ण करण्यासाठी 5 षटकारांची आवश्यकता आहे.
चार षटकानंतर मुंबईचा स्कोर बिनबाद 38 धावा, रोहित-डीकॉकचा जम बसला
पार्श्वभूमी
IPL 2021, MI vs SRH : आज चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. मागील दोन सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागलेल्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा आहे. तर कोलकात्याविरोधात मागील सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली रोहित ब्रिगेड हा सामना जिंकून गुणतालिकेत नंबर एकवर जाण्यास उत्सुक आहे.
हैदराबादला यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यांत धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले आहे. बंगळुरुविरोधात तर दीडशे धावसंख्येचे आव्हानही ते पार करु शकले नाहीत. आजच्या सामन्यात वृद्धिमान साहाऐवजी प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा किंवा केदार जाधवचा संघात समावेश होऊ शकतो. वॉर्नर, बेअरस्टो, राशीद खान यांच्याकडूनच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच मनीष पांडे आणि अब्दुल समदच्या खेळीकडेची सर्वांचे लक्ष आहे. गोलंदाजीत टी. नटराजन, भुवनेश्वर कुमारलाही विशेष चमक दाखवता आलेली नाही.
दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव आणि इशान किशनसह पांड्या ब्रदर्सकडून चांगल्या कामगिरी अपेक्षा मुंबईला आहे. फलंदाजांची मजबूत फळी असताना देखील मुंबईला मागील दोन सामन्यात 160 च्या वर धावा करता आलेल्या नाहीत. मागील सामन्यातील सामनावीर राहुल चहर याच्यासह जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मार्को जॅन्सेन यांच्याकडून गोलंदाजीत विशेष अपेक्षा असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -