Delhi vs Hyderabad : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर 8 गडी राखत  विजय मिळवला आहे. हैदराबादनं दिलेलं 135 धावांचं आव्हान दिल्लीने 17.5 षटकात पूर्ण केलं.


दिल्ली कॅपिटल्सच्या टीम 18 ओव्हर्समध्ये दोन विकेट गमावत टार्गेट कमावले. श्रेयस अय्यरने 47 धावा केला. शिखर धवनने 42 धावा केल्या. कॅप्टन रिषभ पंतने 21 बॉलमध्ये 35 धावा केल्या. आता दिल्लीची टीम 14 गुणांसह पॉइट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचल्या आहेत. 


तत्पूर्वी,  दिल्ली कॅपिटल्सने शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 134 धावांवर रोखले. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक 28 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सकडून कागिसो रबाडाने तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय एनरिक नॉर्टजे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नर खाते न उघडता बाद झाला. हैदराबादने डेव्हिड वॉर्नर (0), रिद्धीमान साहा (18), कर्णधार केन विल्यमसन (18) आणि मनीष पांडे (17) यांच्या रूपाने आपले चार विकेट गमावले.


यानंतर थोड्याच वेळात केदार जाधव (03) एक धाव काढल्यानंतर बाद झाला आणि त्यानंतर अक्षर पटेलने जेसन होल्डरला (10) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अब्दुल समदने डाव सांभाळत काही फटके खेळले. पण, तोही सातवा फलंदाज म्हणून बाद झाला. समदने 21 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या.


यानंतर राशिद खानने 19 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्या, तर संदीप शर्मा खाते न उघडता धावबाद झाला. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमार तीन चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद राहिला.


दिल्ली कॅपिटल्सकडून कागिसो रबाडाने 37 धावांत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय एनरिक नॉर्टजेने 12 धावांत दोन आणि अक्षर पटेलने 21 धावांत दोन बळी घेतले.