मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज  3,608 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 285  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 49 हजार 029  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. 


राज्यात आज 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (1),  धुळे (1), जालना (50), लातूर (90), परभणी (75), हिंगोली (18), नांदेड (16),   अमरावती (92), अकोला (28), वाशिम (07), बुलढाणा (33), यवतमाळ (05), नागपूर (142),  वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (7), चंद्रपूर (72),   गडचिरोली (18 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 39 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,64,416 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,678  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 488 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 488 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 359 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,16,1116 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4706 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1187 दिवसांवर गेला आहे. 


गेल्या 24 तासात 27 हजार नवे रुग्ण तर 383 जणांचा मृत्यू


देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार सुरुच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशामध्ये 26,964 नव्या रुग्णांची भर पडली असून 383 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशात 34,167 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात 26,115 रुग्णांची भर पडली होती.  केरळमध्ये मंगळवारी 15,768 जणांना कोरोनाची लागण झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही  एक लाख 61 हजार 195 इतकी आहे.