एक्स्प्लोर

IPL 2020 RR vs CSK: अशारितीने जोफ्रा आर्चरने केवळ दोन चेंडूत ठोकल्या 27 धावा

पहिल्या दोन चेंडूंवर षटकार, यानंतर लागोपाठ दोन नो-बॉलवर षटकार, एक वाईड आणि अखेरच्या 3 चेंडूंवर एकेरी धाव अशा पद्धतीने एन्गिडीने शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या.

IPL 2020 RRvsCSK | आयपीएल 2020 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शारजाहमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकांमुळे राजस्थानने 20 षटकांत 216 धावा केल्या आहेत. अखेरच्या षटकात राजस्थानने 30 धावा केल्यात.

जोफ्रा आर्चरच्या दोन चेंडूत 27 धावा 

राजस्थानची धावसंख्या 19 षटकात 7 गडी गमावून 186 होती. यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने शेवटच्या षटकात चेंडू लुन्गि एन्गिडीकडे सोपवला. एन्गिडीच्या पहिल्याच चेंडूवर आर्चरने जोरदार षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूही आर्चर सीमेपलिकडे टोलवला. त्यानंतर एन्गिडीने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. आर्चरनेही त्या चेंडूवरही षटकार ठोकला. अशा प्रकारे त्या चेंडूवर सात धावा निघाल्या. यानंतर एन्गिडीने पुढचा चेंडूही नो बॉलही टाकला, त्यावर आर्चरने पुन्हा षटकार मारला. अशा प्रकारे या चेंडूवर सात धावा निघाल्या. यानंतर एन्गिडीने वाइड बॉल टाकला. अशाप्रकारे, आर्चरने केवळ दोन चेंडूंमध्ये 27 धावा केल्या. तर पहिल्या दोन चेंडूंवर षटकार, यानंतर लागोपाठ दोन नो-बॉलवर षटकार, एक वाईड आणि अखेरच्या 3 चेंडूंवर एकेरी धाव अशा पद्धतीने एन्गिडीने शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या.

आर्चरसोबत टॉम कुर्रन 10 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी संजू सॅमसनने 74 आणि स्टीव्ह स्मिथने 69 धावांची खेळी केली. अशाप्रकारे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सपर किंग्जला 217 धावांचे लक्ष्य ठेवलं.

संजू सॅमसनचं मोसमातील सर्वात जलद अर्धशतक

त्याआधी संजू सॅमसनने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. आयपीएल 2020 मधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. सॅमसनने 32 चेंडूत एक चौकर 9 षटकारांसह 74 धावा केल्या. यासह सॅमसन आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थानकडून 2018 मध्ये जॉस बटलरने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

तसेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. याआधी केएल राहुलने 2019 मध्ये चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Embed widget