MI vs KKR: आयपीएल 2020 स्पर्धेतील 32 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून अबूधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स सध्या अव्वल चारमध्ये आहे. मात्र, सुनील नारायण संघात नसल्यामुळे संघाला सुनीलची कमतरता जाणवेल.

Continues below advertisement

मुंबई इंडियन्सच्या तुलनेत कोलकाताची फलंदाजी विभागात किंवा बॉलिंग विभागात स्टार खेळाडू नाहीयेत. अशा परिस्थितीत या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मोठ्या आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईला हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये प्रथम स्थान मिळवायचे आहे.

Weather Report- हवामान कसे असेल

Continues below advertisement

अबू धाबी येथील शेख जाएद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात हवामान पूर्णपणे स्वच्छ राहिल. मात्र, येथे खेळाडूंना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. येथे दव पडणार नाही, म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

IPL 2020 | दिनेश कार्तिकनं सोडलं KKRचं कर्णधारपद; आता 'या' स्टार खेळाडूकडे संघाची धुरा

Pitch Report- पिच रिपोर्ट

अबू धाबी येथील शेख जाएद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शारजा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत पूर्णपणे भिन्न आहे. आकाराच्या बाबतीत हे मैदान बरेच मोठे आहे. परंतु, येथे फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत दोन्ही संघ दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतात.

गूगलचा घोळ : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा झाली या प्रसिद्ध खेळाडूची पत्नी दोन्ही संघांमधील संभाव्य अकरा खेळाडू संभाव्य मुंबई इंडियन्स इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरण पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिनसन आणि जसप्रीत बुमराह.

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन - टॉम बंटन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इयोन मॉर्गन, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती आणि पॅट कमिन्स.