IPL 2020 CSK vs RR: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 13 व्या सत्रातील 37 व्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 125 धावा केल्या. 126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने अवघ्या 17.3 षटकांत 3 गड्यांच्या बदल्यात लक्ष पूर्ण केलं.


राजस्थानच्या विजयात जोस बटलरचा महत्त्वाचा वाटा होता. बटलरने 48 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्याच्याशिवाय स्टीव्ह स्मिथनेही 34 चेंडूत 26 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार लगावले. या दोघांशिवाय बेन स्टोक्स 19, रॉबिन उथप्पा 04 आणि संजू सॅमसन शून्य धावांवर बाद झाला. चेन्नईकडून दीपक चहरने 2 आणि जोश हेजलवुडने एक गडी बाद केला.


तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 126 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. फाफ डू प्लेसिसच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का 13 धावांवर बसला. यानंतर चेन्नईला गळतीचं लागली. फाफ डू प्लेसिस 10, सॅम कुरन 22, शेन वॉटसन 08, अंबाती रायडू 13, धोनी त्याच्या 200 व्या सामन्यात 28 धावांवर बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 30 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी साकारली. संघाची धावसंख्या 125 पर्यंत पोहोचविण्यात धोनी आणि जडेजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.


IPL 2020 : मैदानावर उतरताच धोनी इतिहास रचणार; अशी कामगिरी करणारा सीएसकेमधील पहिला खेळाडू


चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन: फाफ डू प्लेसिस, सॅम कुरन, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दीपक चहर, पियुष चावला, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवुड


राजस्थान रॉयल्स इलेव्हन खेळत: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रायन पराग, राहुल टियोटिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी