गडचिरोली : उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती हद्दीतील किसनेली जंगल परिसरात रविवारी सायंकाळी 4 वाजता पोलीस दलाच्या सी-60 जवान व नक्षलवाद्यांत चकमक उडाली. या चकमकीमध्ये 4 महिला व 1 पुरुष असे 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांनी यश आले. ठार झालेल्या पाचही नक्षलवाद्यांवर 18 लाखांचे बक्षीस होते. चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.


समीता ऊर्फ राजो किरको (वय 34 वर्ष रा. मुंगनेर ता धानोरा जि. गडचिरोली) ही प्लाटुन क्र. 15 ची सदस्या होती. ती सन 2011-12 मध्ये प्लाटुन क्र. 20 मध्ये भरती होवुन सन 2012-13 मध्ये तिने पोटेगाव दलम सदस्य म्हणुन काम केले. त्यानंतर सन 2013-14 ते आजपर्यंत ती प्लाटुन क्र. 15 चे सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 2 खुन, 9 चकमकी व इतर 3 असे एकुण 14 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने 4 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.


कुमली चिपळुराम गावडे (वय 23 वर्ष रा. कटेझरी ता. धानोरा जि. गडचिरोली) ही कोरची दलम सदस्या होती. ती 2016 मध्ये भरती होऊन, सन 2016 ते 2018 पर्यंत टिपागड एलओएसमध्ये कार्यरत होती व सन 2018 ते 2020 पर्यंत कसनसुर एलओएस मधील डीव्हीसीएम सृजनक्काची बॉडीगार्ड पदावर कार्यरत होती. सद्या ती कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकुण 2 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.


भन्नाट उपक्रम... नक्षलग्रस्त भागात पहिला पुल कम बंधारा लोकार्पित, गडचिरोलीत दळणवळण अन सिंचनाची सांगड


सुमन ऊर्फ झुनकी ऊर्फ सुलकी बुच्चा पदा (वय 32 वर्ष रा. पिपली बुर्गी ता. एटापल्ली जि. गडचिरोली) ही टिपागड दलम एसीएम सदस्या असुन, ती सन 2006-07 मध्ये भरती होऊन सन 2009 पर्यंत ती मिलीशिया सदस्य म्हणुन कार्यरत होती. सन 2009 ते 2011 पर्यंत ती इतर राज्यात व जिल्ह्यात सदस्य म्हणुन काम केले. व त्यानंतर सन 2012-13 मध्ये ती कसनसुर एलओएसमध्ये कार्यरत होती. सन 2013 ते सन 2018 पर्यंत ती प्लाटुन क्र. 3 व 4 मध्ये पीपीसीएम म्हणुन कार्यरत होती. सन 2018-19 मध्ये प्लाटुन 15 मध्ये ती पीपीसीएम म्हणुन कार्यरत होती. सन 2019 ते आजपर्यंत टिपागड एलओएसमध्ये एसीएम सदस्या पदावर कार्यरत होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 1 खुन, 14 चकमक व इतर 6 असे एकुण 21 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने 6 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.


चंदा ऊर्फ चंदना ऊर्फ मासे भालसे/भाकसे (वय 25 वर्ष रा. बुडगीन ता. जेगरगुन्डा जि. बिजापुर, बस्तर एरिया, छत्तीसगढ.) ही प्लाटुन क्र. 15 ची सदस्य असुन, ती सन 2018 मध्ये भरती होऊन आजपर्यंत प्लाटुन क्र 15 ची सदस्य म्हणुन कार्यरत होती. तिच्यावर शासनाने 4 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.


टिरा ऊर्फ निलेश ऊर्फ शिवाजी दारसु मडावी (वय ३० वर्ष रा. चिचोडा ता. धानोरा जि. गडचिरोली) हा टिपागड दलम सदस्य असून, तो सन 2015 मध्ये भरती होऊन सन 2019 पर्यंत चातगाव एलओएसमध्ये सदस्य म्हणुन कार्यरत होता व त्यानंतर सन 2019 ते आजपर्यंत तो टिपागड दलम सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 6 खुन, 7 चकमक व इतर 7 असे एकुण 20 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर शासनाने 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.


या वर्षात आतापर्यंत 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले असून, सन 2020 या वर्षातील गडचिरोली पोलीस दलाची सर्वात मोठी कामगिरी आहे. सी-60 कमांडोंच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे.


नक्षल्यांची आता पोलिसांवर थेट ड्रोनद्वारे नजर? ड्रोन सदृश वस्तूचा नक्षलींशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय