IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आपापसांत भिडणार आहेत. सीएसके आणि राजस्थान दोन्ही संघासांठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्ले ऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आजच्या सामन्यात उतरल्यावर इतिहास रचणार आहे.


महेंद्र सिंह धोनी राजस्थान रॉयल्स विरोधात मैदानावर उतरताच सीएसकेसाठी 200 सामने खेळाणारा पहिला खेळाडू बनणार आहे. धोनीने 2008मध्ये सीएसकेसाठी आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळला होता. धोनीने काही दिवसांपूर्वीच सुरेश रैनाच्या नावावर असलेला सीएसकेसाठीचा सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.


सीएसकेसाठी आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 199 सामन्यांत धोनीचा रेकॉर्ड दमदार आहे, 199 सामन्यांत धोनीने 23 अर्धशतकं आणि 4,568 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार फटकावणाऱ्यांच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.


महेंद्र सिंह धोनीने आतापर्यंत 215 षटकार फटकावले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार क्रिस गेलने फटकावले आहेत. क्रिस गेल 333 षटकारांसोबत पहिल्या क्रमांकावर आहे. तर एबी डिविलियर्स 231 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.





प्ले ऑफसाठी आवश्यक सामना


प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोनीच्या संघाला राजस्थान रॉयल्स विरोधात विजय मिळवणं अत्यंत आवश्यक आहेत. सीएसकेने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. आणि केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर राजस्थान रॉयल्सचा संघ या सामन्यात हरला तर त्यांनाही प्ले ऑफच्या सामन्यातून जवळपास बाहेरची वाट पाहावी लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


IPL 2020 MI vs KXIP | अफलातून क्षेत्ररक्षण, जबरदस्त फलंदाजी; दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मयंकची कमाल


आयपीएलच्या मैदानात 'रॉकस्टार' अंपायर, पश्चिम पाठक यांची अनोखी स्टाईल सोशल मीडियात ट्रेंड