एक्स्प्लोर
Advertisement
IPL 2019 : दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर पुढील सामने ठरणार
'आयपीएल 12' च्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आयपीएलच्या आगामी पर्वाचं पुढील वेळापत्रक जाहीर होईल.
मुंबई : आयपीएलच्या बाराव्या पर्वाचं अंशतः वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. 23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीतील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर पुढील टाईमटेबल ठरवण्यात येणार आहे.
आयपीएल 2019 चा सलामीचा सामना गतविजेते चेन्नई सुपरकिंग्ज हे बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरोधात खेळणार आहेत. चेन्नईत शनिवार 23 मार्चला हा सामना खेळवण्यात येईल.
'आयपीएल 12' च्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आयपीएलच्या आगामी पर्वाचं पुढील वेळापत्रक जाहीर होईल.
23 मार्च ते 5 एप्रिल या 14 दिवसांच्या कालावधीत 17 सामने खेळवले जाणार आहेत. 24, 30 आणि 31 मार्च या वीकेंडला प्रत्येकी दोन सामने होतील.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या कालावधीत प्रत्येकी पाच सामने खेळणार आहेत. तर उर्वरित सहा संघ प्रत्येकी चार सामने खेळतील.
तारीख | दिवस | वेळ | संघ | ठिकाण |
23 मार्च | शनिवार | संध्याकाळ | चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | चेन्नई |
24 मार्च | रविवार | दुपार | कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद | कोलकाता |
24 मार्च | रविवार | संध्याकाळ | मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स | मुंबई |
25 मार्च | सोमवार | संध्याकाळ | राजस्थान रॉयल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब | जयपूर |
26 मार्च | मंगळवार | संध्याकाळ | दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज | दिल्ली |
27 मार्च | बुधवार | संध्याकाळ | कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब | कोलकाता |
28 मार्च | गुरुवार | संध्याकाळ | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. मुंबई इंडियन्स | बंगळुरु |
29 मार्च | शुक्रवार | संध्याकाळ | सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स | हैदराबाद |
30 मार्च | शनिवार | दुपार | किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स | मोहाली |
30 मार्च | शनिवार | संध्याकाळ | दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स | दिल्ली |
31 मार्च | रविवार | दुपार | सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | हैदराबाद |
31 मार्च | रविवार | संध्याकाळ | चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स | चेन्नई |
1 एप्रिल | सोमवार | संध्याकाळ | किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स | मोहाली |
2 एप्रिल | मंगळवार | संध्याकाळ | राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | जयपूर |
3 एप्रिल | बुधवार | संध्याकाळ | मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज | मुंबई |
4 एप्रिल | गुरुवार | संध्याकाळ | दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद | दिल्ली |
5 एप्रिल | शुक्रवार | संध्याकाळ | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. कोलकाता नाईट रायडर्स | बंगळुरु |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement