एक्स्प्लोर

IPL 2019 Final, MIvCSK : 'तो' क्षण मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरला : सचिन तेंडुलकर

आयपीएलच्या बाराव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करुन आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला अंतिम सामन्यात एका धावेने पराभूत करुन चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आणि विक्रम प्रस्थापित केला. हैदराबादमध्ये रविवारी (12 मे) खेळवलेल्या अतिशय थरारक सामन्यात मुंबईने चेन्नईवर अखेरच्या चेंडूवर एका धावेने विजय मिळवाला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने चेन्नईच्या पराभवाचं कारण सांगितलं. कर्णधार महेंद्रसिंह धोनी धावचीत होणं हे चेन्नईच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण असल्याचं सचिन म्हणाला. 'धोनी बाद होणं हा सामन्याचा टर्निंग पॉईंट' चेन्नईच्या डावाच्या तेराव्या षटकात कर्णधार महेंद्र सिंह धोनी दोन धावा करुन बाद झाला. ईशान किशनच्या थ्रोवर धोनी धावचीत झाला. धोनीने ओव्हर थ्रोवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण ईशान किशनने थेट स्टंपवर निशाणा साधला आणि धोनी पॅव्हेलियनमध्ये परतला. IPL 2019 Final, MIvCSK : 'तो' क्षण मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरला : सचिन तेंडुलकर 1148657313 धोनी बाद झाला आणि सामना फिरला, असं सचिनने सांगितलं. याशिवाय जसप्रीत बुमराची गोलंदाजीही फार महत्त्वाची ठरल्याचं सचिन तेंडुलकरने सांगितलं. तो म्हणाला की, "मलिकांचं एक षटक अतिशय महागडं ठरलं, पण नंतरच्या षटकात बुमराने काही प्रमाणात समतोल साधला. बुमराने चार षटकांत केवळ 14 धावा देऊन एक विकेटही घेतली. शॉन वॉर्नची 80 धावांची खेळी दुसरीकडे शेन वॉटसनवरही दबाव वाढला. हा क्षण फार महत्त्वाचा होता, असं सचिनने सांगितलं. शेन वॉटसनने तीन जीवदानांचा लाभ उठवून 80 धावांची तुफानी खेळी केली, पण संघासाठी तो विजय मिळवून देऊ शकला नाही. सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर अनुभवी लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकूरला पायचीत करुन सामना आणि ट्रॉफी मुंबईला मिळवून दिली. मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय चहर आणि पंड्याचं कौतुक सचिनने फिरकीपटू राहुल चहर याचंही कौतुक केलं. तो म्हणाला की, "मी पहिल्या सामन्यानंतरच चहरबद्दल माझं मत मांडलं होतं आणि चहरने दमदार कामगिरी केली असं मला वाटतं. फिरकीपटूंनी उत्तम गोलंदाजी केली आहे." सोबतच सचिन तेंडुलकर हार्दिक पंड्याचं कौतुक करायलाही विसरला नाही. "पंड्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी संघासाठी उत्तम खेळी केली आहे," असं सचिनने सांगितलं. मुंबईला आयपीएलचं चौथ्यांदा विजेतेपद मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 8 विकेट्सच्यो मोबदल्यात 149 धावा केल्या. 'सी-सॉ'प्रमाणे हा सामना रंगला. अखेर मुंबईने पराभवाच्या तोंडातून विजय मिळवला आणि आयपीएलची ट्रॉफीही चौथ्यांदा आपल्या नावावर केली. चेन्नईच्या संघाला 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 148 धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget