एक्स्प्लोर

यंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर

यंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने यंदाच्या आयपीएल मोसमाची मुंबईतील वानखेडे स्टेडिअममधून सुरुवात होणार आहे. 7 एप्रिलला हा सामना खेळवण्यात येईल. यंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. गतविजेत्या संघाच्या होमग्राऊंडवरच नव्या मोसमाचा पहिला सामना खेळवण्यात येतो. त्यानुसार हा मान मुंबईला मिळाला आहे. तर अंतिम सामन्याचा मानही मुंबईलाच देण्यात आला आहे, जो 27 मे रोजी वानखेडेवर खेळवण्यात येईल.  9 मैदानांवर 51 दिवसात 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. एकाच दिवशी दोन सामन्यांची सुरुवात 8 एप्रिलला दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्याने होईल. तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात ईडन गार्डनवर होईल. दरम्यान, बीसीसीआयने ब्रॉडकास्टिंग स्पॉन्सर स्टार स्पोर्ट्सची सामन्यांची वेळ बदलण्याची मागणी मान्य केल्याचं दिसत नाही. कारण नियमित वेळेप्रमाणेच सामने सुरु होणार आहेत. दुपारचा सामना 4 वाजता, तर रात्रीचा सामना 8 वाजताच सुरु होईल. दुपारचा सामना 4 ऐवजी 5.30 वाजता, तर रात्रीचा सामना 7 वाजता सुरु करावा, अशी मागणी स्टार स्पोर्ट्सने केली होती. यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचं दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन होत आहे. जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडिअम हे राजस्थान रॉयल्सचं होमग्राऊंड असेल. राजस्थानची पहिली लढत 9 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादशी होईल. संबंधित बातम्या : आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी ... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय

व्हिडीओ

Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Navnath Ban On Rohit Pawar : एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
Navnath Ban and Shivraj More: नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar: आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
Embed widget