एक्स्प्लोर
Advertisement
बोल्टला झटका, बीजिंग ऑलिम्पिकमधील सुवर्ण गमावण्याची वेळ
लौसाने (स्वित्झर्लंड) : जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टला मोठा धक्का बसला आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं एक सुवर्णपदक गमावण्याची वेळ बोल्टवर आली आहे. रिले संघातील सहकारी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्यांचं सुवर्ण काढून घेण्यात आलं आहे.
2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या संघानं फोर बाय हंड्रेड मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. पण त्या संघाचा सदस्य असलेल्या नेस्टा कार्टरनं प्रतिबंधित उत्तेजकांचं सेवन केल्याच आयओसीनं केलेल्या पुनर्तपासणीत स्पष्ट झालं आहे.
या तपासणीमुळे जमैकन संघाचं बीजिंगंधलं रिलेचं सुवर्णपदक काढून घेतलं जाणार आहे. त्याऐवजी ट्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संघाला पहिल्या स्थानी बढती मिळाली असून, जपानला रौप्य तर ब्राझिलला कांस्यपदक बहाल केलं जाणार आहे. बोल्टकडे एकूण नऊ सुवर्णपदकं जमा होती, मात्र त्यापैकी एक परत करावं लागल्याने ती संख्या आठवर पोहचली आहे.
बोल्टनं बीजिंगमध्ये फोर बाय हंड्रेड मीटर रिलेसह 100 आणि 200 मीटर शर्यतींची सुवर्णपदकं मिळवली होती. पाठोपाठ लंडन आणि रिओ ऑलिम्पिकमध्येही त्यानं याच तीन शर्यती जिंकून सुवर्णपदकांची ट्रिपल हॅटट्रिक साजरी केली होती. पण आता बीजिंगमधलं एक सुवर्णपदक त्याला परत करावं लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement