Neena Gupta : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. नीना या वेगवेगळे व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना खास संदेश देतात. नुकताच एक व्हिडीओ शेअर करून नीना यांनी महिलांना कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

Continues below advertisement


नीना गुप्ता यांनी व्हिडीओ शेअर करून लोकांना सांगितले, 'जसे मी आत्ता कपडे परिधान केले आहेत तसेच बोल्ड कपडे जे लोक घातलाल त्यांना लोक ट्रोल करतात.  मला आत्ता हे सांगायचं आहे की, संस्कृतमध्ये माझे शिक्षण झालं आहे, तसेच माझ्याबद्दल बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी मी सांगू शकते. त्यामुळे कपडे पाहून कोणालाही ट्रोल करू नका. ' या व्हिडीओला नीना यांनी 'सच कहूं तो' असं कॅप्शन दिलं आहे. 






नेटकऱ्यांनी केलं नीना गुप्ता यांचे कौतुक
नीना गुप्ता यांच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'एवढ्या प्रेमानं ट्रोलर्सला तुम्ही ओरडत आहात. खूप छान वाटलं हे ऐकून'  तर दुसऱ्या युजरनं कमेंट करत लिहिलं, 'खूप चांगला संदेश तुम्ही दिला आहे.'


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha