Indian Team Record : भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) पराभवा करत पिंक बॉल कसोटीत विजय मिळवला. दुसऱ्य कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंकेवर 238 धावांनी विजय मिळवला. भारताने चौथ्या डावात श्रीलंकेला विजयासाठी 447 धांवाचे आव्हान दिले होते. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याच्या 107 धावांच्या खेळीनंतरही श्रीलंकेचा संघ 208 धावांपर्यंत मजल मारु शकला. दुसऱ्य सामन्यासह भारतीय संघाने दोन सामन्याची कसोटी मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. भारतीय संघाचा मायदेशातील हा लागोपाठ 15 वा मालिका विजय आहे.
मायदेशात भारतीय संघाने लागोपाठ 15 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाने मायदेशात अखेरची कसोटी मालिका 2012 मध्ये गमावली होती. इंग्लंडविरोधात भारतीय संघाला मायदेशात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व धोनीकडे होते. 2012 मध्ये इंग्लंड संघाने चार सामन्याची मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाला मायदेश एकाही देशाला हरवता आलेले नाही.
2012 नंतर भारतीय संघ मायदेशात अजेय आहे. इंग्लंडनंतर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला 4-0 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. मागील दहा वर्षात मायदेशात झालेल्या सर्व कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, न्यूजीलंड, श्रीलंका, बांग्लादेश, वेस्ट विंडिज आणि अफगाणिस्तान हे संघ भारत दौऱ्यावर येऊन गेले. या सर्व संघाना भारताने पराभूत केले. कसोटी खेळणाऱ्या संघात पाकिस्तान, जिम्बाब्वे आणि आयरलंड या देशांनी भारताचा दौरा केलेला नाही. मागील दहा वर्षात आठ देशांना भारतात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला मायदेशात 10 पेक्षा जास्त कसोटी मालिका जिंकता आलेल्या नाहीत. मागील दहा वर्षांत भारतीय संघाने मायदेशात 15 कसोटी मालिका खेळल्या आहेत. यामध्ये 42 कसोटी सामने झाले आहेत.यापैकी फक्त दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. 2017-18 दरम्यान ऑस्ट्रेलियाने पुण्यात भारताला हरवले होते. त्याशिवाय गतवर्षी इंग्लंडच्या संघाने चेन्नई कसोटीत भारताचा पराभव केला होता. हे दोन्ही सामने मालिकेतील पहिले सामने होते. त्यानंतर भारतीय संघाने कमबॅक करत मालिकेवर कब्जा मिळवला होता. मागील दहा वर्षात भारतीय संघाने मायदेशात 34 कसोटी सामने जिंकले आहेत. तर सहा सामने अनिर्णित राहिले आहेत.