मुंबई: गुजरात लायन्सचा धडाकेबाज फलंदाज ब्रेन्डन मॅक्युलमला डाव्या मांडीच्या दुखापतीमुळं आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे.

दिल्लीकडून सात विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर गुजरातचं आयपीएलमधलं आव्हान साखळीतच संपुष्टात आलं आहे. पण यंदाच्या मोसमात गुजरातचे अजूनही तीन सामने शिल्लक आहेत. त्यात ब्रेन्डन मॅक्युलम खेळू शकणार नाही.

यंदाच्या आयपीएल मोसमात कमीतकमी कालावधीत अधिकाधिक सामने खेळवण्याचा झालेला प्रयत्न आणि दर दोन दिवसांआड करावा लागणार प्रवास याचा आपल्यावर ताण पडल्याची नाराजी मॅक्युलमनं सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

https://twitter.com/TheGujaratLions/status/860529880546459648