मुंबई: भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
स्कायमेटनं काल पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर रात्री पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला.
पुण्यातील भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले.
तिकडे चिपळूणमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. तर सांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.