एक्स्प्लोर

विराटचं शतक वाया, विंडीजकडून भारताचा 43 धावांनी पराभव

सामन्यात विंडीजनं टीम इंडियाला विजयासाठी 284 धावांचं आव्हान दिलं होतं. पण विराट कोहलीच्या शतकानंतरही, विंडीज गोलंदाजांनी भारताचा अख्खा डाव 240 धावांत गुंडाळला.

पुणे : वेस्ट इंडिजनं पुण्यातील एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा 43 धावांनी धुव्वा उडवला. विडींजच्या विजयाने पाच सामन्यांच्या मालिकेत मोठी चुरस निर्माण केली आहे. या विजयासह विंडीजनं पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

सामन्यात विंडीजनं टीम इंडियाला विजयासाठी 284 धावांचं आव्हान दिलं होतं. पण विराट कोहलीच्या शतकानंतरही, विंडीज गोलंदाजांनी भारताचा अख्खा डाव 240 धावांत गुंडाळला. भारतीय कर्णधारानं एक खिंड लढवून 107 धावांची खेळी उभारली. भारताच्या अन्य दहा फलंदाजांना मिळून 127 धावाच करता आल्या आहेत.

विडींजनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा अवघ्या 8 धावा करून बाद झाला. शिखर धवन 35 धावा, रिषभ पंत 24 धावा, महेंद्र सिंह धोनी 7 धावा करून बाद झाला. शेवटी भुवनेश्वर कुमारने 10 आणि कुलदीप यादवनं 15 धावांचं योगदान दिलं.

विंडीजकडून मार्लन सॅम्युअल्सनं तीन विकेट घेतल्या. तर कर्णधार जेसन होल्डर, ओबेड मॅकॉय, अॅशले नर्स यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. विंडीज गोलंदाजांसमोर भारताचा डाव 47.4 षटकांत 240 धावांवर आटोपला.

त्याआधी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 50 षटकांत नऊ बाद 283 धावांची मजल मारली. जसप्रीत बुमरानं 35 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून, टीम इंडियाला विंडीजला स्वस्तात रोखता आलं नाही. विंडीजच्या डाव उभारणीत शाय होपनं मोलाची भूमिका बजावली. त्याचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. त्यानं 113 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 95 धावांची खेळी उभारली.

जसप्रीत बुमरानं विंडीजच्या चार विकेट्स काढून यशस्वी पुनरागमन केलं. कुलदीप यादवनं दोन, तर भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

विराटची शतकांची हॅटट्रीक

विराटचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे 38वं शतक झळकावलं. त्यानं 109 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह शतक ठोकलं. याआधी विराटनं गुवाहाटीत 140 धावांची आणि विशाखापट्टममध्ये नाबाद 157 धावांची खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

शाहिद अफ्रिदीने आमिरच्या कानशिलात लगावलेली अन् पाकिस्तान क्रिकेट हादरलं! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा Scandal
शाहिद अफ्रिदीने आमिरच्या कानशिलात लगावलेली अन् पाकिस्तान क्रिकेट हादरलं! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा Scandal
Team India Schedule : श्रीलंका दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?, सप्टेंबरमध्ये रोहित, विराट, वैभव सगळेच मैदानात दिसणार; कुठे-कधी होणार सामने? जाणून घ्या Schedule
श्रीलंका दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?, सप्टेंबरमध्ये रोहित, विराट, वैभव सगळेच मैदानात दिसणार; कुठे-कधी होणार सामने? जाणून घ्या Schedule
IND vs SL Test Series : कुणाच्या पाठीवर नंबरचा टॅटू, तर कोणाच्या खांद्यावर काळे-निळे डाग; कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून सगळे हादरले
कुणाच्या पाठीवर नंबरचा टॅटू, तर कोणाच्या खांद्यावर काळे-निळे डाग; कोलंबोतील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो पाहून सगळे हादरले
Devdutt Padikkal : देवदत्त पडिक्कल ट्रॉफी मिळाली; पण श्रीलंकेची दाणादाण उडवणारा 'हा' खेळाडू राहिला रिकाम्या हाती
देवदत्त पडिक्कल ट्रॉफी मिळाली; पण श्रीलंकेची दाणादाण उडवणारा 'हा' खेळाडू राहिला रिकाम्या हाती

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
MNS : मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ; मनसे आक्रमक, कोर्टात जाणार असल्याची माहिती, मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष म्हणाले, '2016 साली....'
आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते; कांदा दरवाढीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य
आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते; कांदा दरवाढीवरुन देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
लग्नानंतर पतीनं कष्ट करून शिकवलं; परीक्षा दिली पोलीस बनली अन्..., नोकरी मिळताच महिला कॉन्स्टेबल प्रियकरासोबत झाली फरार
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
दिल्लीनंतर आता कांद्याची 'चेन्नई एक्सप्रेस'; मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियानप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियानप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Embed widget