त्रिनिनाद : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना आज क्विन्स् पार्क ओव्हलच्या मैदानात खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसाने धुतल्यानंतर दोन्ही संघ दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. मालिकेतील पहिला सामना गयानामध्ये खेळला गेला होता. पावसामुळे केवळ 13 षटकांचाच खेळ झाला होता. दरम्यान आजच्या सामन्यात हवामान चांगले असून पावसाची शक्यता नगण्य आहे.

दरम्यान आज, वेगवान गोलंदाज खलील अहमदला अंतिम 11 जणांमधून संघाबाहेर ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजांना तीन षटकांत २७ धावा काढू देणारा अहमद महागडा ठरला होता.  सलामीवीर एव्हिन लेविसने अहमदच्या गोलंदाजीवर आक्रमण करताना नाबाद ४० धावा केल्या होत्या. अहमदऐवजी नवख्या नवदीप सैनीचा किंवा यजुर्वेद्र चहलचा संघात समावेश केलाजाण्याची शक्यता आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही विश्रांती दिली जाऊ शकते.

दुसरीकडे एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम तोडण्याची संधी धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलला आहे. पहिल्या सामन्यात गेलने ३१ चेंडूत केवळ चारच धावा केल्या होत्या. दुसरीकडे निरोपाचा कसोटी सामना खेळण्याच्या स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या प्रस्ताव वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने नाकारला आहे. तर विराट कोहलीला वेस्ट इडनीज विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. 19 धावा केल्यानंतर विराट विंडीज विरोधात सर्वाधिक धावा करण्याचा पाकच्या जावेद मियांदादचा विक्रम मोडेल.
 संघ
भारत - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, लोकेश राहुल, मनीष पांडे, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल

वेस्ट इंडिज - ख्रिस गेल, एविन लुईस, शाय होप, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रॉस्टन चेस, जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट, फॅबियन एलन, शेल्डन काट्रेल, किमा रूच, जॉन कॅप्मबेल, किमो पॉल, ओशेन थॉमस