अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सध्या Amazon Freedom Sale 2019 सुरु आहे. या ऑनलाइन सेलचा आज शेवटचा दिवस आहे. 8 अॅमेझॉन इंडियाकडून ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या काळात फ्रीडम सेलचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्टफोन्स, स्पीकर्स, हेडफोन्स अशा अनेक उपकरणांसहित इतर अनेक गोष्टींवर भरघोस सूट देण्यात आलेली आहे.


अॅमेझॉनच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर या सेलमधील ऑफर्सची माहिती देण्यात आलेली आहे. या सेल दरम्यान एसबीआयचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.

'या' आहेत खास ऑफर्स :

या सेलदरम्यान iPhone XR वरील ऑफर सर्वात आकर्षक ऑफर मानली जात आहे. 128 जीबी क्षमतेचा 81 हजार 900 रुपये किंमत असलेला हा मोबाईल सध्या 56 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तर 64 जीबी क्षमतेचा iPhone XR  हा मोबाईल 51 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

या सेलदरम्यान काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या वन प्लस 7 या मोबाईल फोनच्या किंमतीवर काही सूट देण्यात आलेली नाही. मात्र या फोनच्या खरेदीवेळी जून्या मोबाईल फोनच्या एक्सचेंजवर 2 हजार रुपये अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. तसेच 6 महिन्यापर्यंत 'नो कॉस्ट ईएमआय'ची सुविधाही देण्यात येत आहे.

गुगलचा Google Pixel 3a XL हा 50 हजार रुपये किंमत असलेला स्मार्टफोन 39 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

सॅमसंगच्या Galaxy M30 या स्मार्टफोनवर 15 टक्केपर्यंत सूट देण्यात येत आहे. 16 हजार 490 रुपये किंमतीचा हा फोन सध्या 13 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे.

या सोबतच इतर अनेक स्मार्टफोन्सवरही आकर्षक सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फर्निचर, कपडे यावरही आकर्षक सूट देण्यात येत आहे.