एक्स्प्लोर

INDvsWI 1st ODI | टी-20 त विंडीजचा धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया वनडे मलिका जिंकण्यासाठी सज्ज

या मालिकेतला पहिला वन डे सामना आज सायंकाळी 7 वाजता गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे बाहेर गेलेला शिखर धवन या सामन्यात पुन्हा वन डे पुनरागमन करेल.

गयाना : विश्वचषकातल्या उपांत्य फेरीतल्या अपयशानंतर विराट कोहलीची टीम इंडिया 50-50 षटकांच्या फॉरमॅटसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला वन डे सामना आज सायंकाळी 7 वाजता गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे बाहेर गेलेला शिखर धवन या सामन्यात पुन्हा वन डे पुनरागमन करेल. तर लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावरची जबाबदारी पार पाडेल. याशिवाय मनिष पांडे, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या युवा खेळाडूंच्या कामगिरी महत्वाची ठरेल. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या टी20 सामन्यात विंडीजचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून मालिका 3-0 अशी जिंकली आहे. यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे.  भारताचा तिसरा सर्वोत्तम फलंदाज शिखर धवन सलामीला परतणार आहे. तर विश्वचषकात पाच शतके नोंदवणारा रोहित एकदिवसीय प्रकारातील सातत्य पुन्हा सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. धवन परतल्यामुळे लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकेल. केदार जाधव आणि ऋषभ पंत परिस्थितीनुसार पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल संघात परतणार असल्यामुळे भारतासाठी एकदिवसीय मालिकेतील आव्हान सोपे नसणार आहे. भारताविरुद्धची मायदेशातील मालिका खेळून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा गेलने विश्वचषकादरम्यान केली होती. त्यामुळे गेलची ही शेवटची एकदिवसीय मालिका असणार आहे. गयानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात विंडीजने टीम इंडियासमोर विजयासाठी 147 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हे आव्हान पाच चेंडू आणि सात विकेट्स राखून पार केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget